रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने एकट्याने खेळायला हवं आणि…”, अरबाज पटेलच्या वडिलांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले, “त्याला संधी मिळाली त्यामुळे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 6, 2024 | 3:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arbaaz patel father on Bigg Boss Marathi Season 5

‘बिग बॉस मराठी’ची ऑफर मिळाल्यानंतर अरबाजच्या बाबांची होती ही प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Season 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची चांगलीच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाचं हे पर्व स्पर्धकांनी विशेष गाजवलं आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धक आपापल्या खेळण्याच्या पद्धतीने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. या स्पर्धकांपैकी एक ताकदवान स्पर्धक म्हणजे अरबाज पटेल. अरबाजने याआधी रोड़ीजसारख्या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांची मन जिंकली. यानंतर आता अरबाज ‘बिग बॉस मराठी’ मधून साऱ्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. अरबाजने स्वतःकडे असलेल्या ताकदीच्या बळावर टास्क जिंकले. ताकद वापरल्याने अनेकदा अरबाज ट्रोलही झालेला पाहायला मिळाला.

अरबाजच्या आतापर्यंत संपूर्ण खेळाविषयी त्याच्या वडिलांनी भाष्य केलं आहे. तसंच ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं. अरबाज पटेलच्या वडिलांनी नुकतीच ‘७ स्टार मराठी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अरबाजच्या एकंदरीत खेळाविषयी भाष्य केलं. तसंच त्याला काही मोलाचे सल्ले देखील दिले. सुरुवातीला त्यांना विचारलं गेलं की, “‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आल्यानंतर काय प्रतिक्रिया होती?”.

आणखी वाचा –“त्याचा निर्णय टोकाचा वाटला पण…”, कलावंत पथक आस्ताद काळेने सोडण्यावरुन सौरभ गोखलेचं भाष्य, म्हणाला, “कुठलीही गोष्ट…”

View this post on Instagram

A post shared by Arbaz Shaikh (@mr.arbazpatel)

यावर अरबाजचे वडील उत्तर देत म्हणाले, “जेव्हा अरबाजला ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आली तेव्हा आम्हा आई-वडिलांसाठी ही गर्वाची गोष्ट वाटली. कारण महाराष्ट्राचा मोठा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ हा आहे. आज हा शो इतका मोठा झाला आहे त्यामुळे हे मला सांगायला खूप आनंद होतं आहे की माझा मुलगा या शोमध्ये सहभागी आहे. महाराष्ट्राची जनता या शोला भरभरुन प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे मला खूप गर्व आहे तो ‘बिग बॉस मराठी’मध्ये गेला आहे.”

आणखी वाचा – लेकाला सोडून भारतात परतताना निवेदिता व अशोक सराफ भावुक, म्हणाल्या, “सर्वात कठीण गोष्ट…”

पुढे अरबाजच्या वडिलांना अरबाजच्या खेळाविषयी विचारलं. तेव्हा अरबाजचे वडील म्हणाले, “अरबाज चांगला खेळत आहे. पण मला असं वाटतं, त्याने एकट्याने खेळलं पाहिजे. कारण त्या घरामध्ये ‘बिग बॉस’ जे टास्क देतात त्यामध्ये थोडफार वेगवेगळं खेळलं पाहिजे. अरबाजला स्वतःचा खेळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याने स्वतःचा खेळ चांगला खेळला पाहिजे”.

Tags: arbaaz patel fatherbigg boss marathibigg boss marathi season 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Arbaaz Patel father talked about his son relationship with Nikki Tamboli

Bigg Boss Marathi : "प्रेम खोटं, तिनेच त्याला गुंतवून ठेवलं आणि…", निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाजच्या वडिलांचं मोठं भाष्य, म्हणाले, "कमिटेड असूनही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.