‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आर्या अर्जुनच्या आयुष्यात येण्यासाठी, अर्जुन बरोबर कायम वेळ घालवण्यासाठी रूपालीच्या सांगण्यावरुन बरं नसण्याचं नाटक करते. धुळीचा त्रास असल्याने ती स्वतःला धुळीचा त्रास करुन घेते आणि अर्जुनला फोन करुन बोलावून घेते. परिस्थिती पाहून अर्जुन आर्याला एकटं सोडणं कठीण आहे त्यामुळे रूपालीच्या सांगण्यावरुन आर्याला तो अप्पीच्या घरी घेऊन येतो. या वेळेला अर्जुन अप्पीची परवानगी घेतो तेव्हा अप्पी म्हणते की, आर्याला बरं वाटेपर्यंत तिला इथे राहू द्या. असंही तिची काळजी घेणार असं कोणी नाही आहे हे ऐकल्यावर सर्वांना अप्पीचं कौतुक वाटतं. तर आर्या इकडे आल्यानंतर आता अर्जुन तिच्यापासून कसा दूर जाणार नाही याकडे तिचं लक्ष लागून राहिलेलं असतं. (Appi Amchi Collector Serial Update)
आर्या जेव्हा घरी येते तेव्हा रूपाली अप्पीला आर्याचा नाश्ता आणून देण्याबद्दल सांगते तेव्हा सगळे जण रूपालीकडे पाहू लागतात. मात्र रूपाली बाजू सावरत तिला गोळ्या घ्यायच्या आहेत म्हणून म्हटलं असं म्हणते आणि अप्पी आर्याला पोहे आणून देते. त्यानंतर आर्या पोहे न खाण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा रूपाली अर्जुनला पोहे तिला भरवायला सांगते हे सगळं अमोल व अप्पी पाहून नाराज होतात. त्यानंतर अप्पी किचनमध्ये काम करत असते तेव्हा अमोल येऊन अप्पीची समजूत काढतो आणि म्हणतो की, तू काहीच काळजी करु नकोस त्यानंतर अप्पी सांगते की, मी आता कामाला जात आहे त्याआधी मी आर्या मावशीला काय हवं ते पाहून येते. तेव्हा अमोल तिच्याबरोबर जातो तर इकडे अर्जुन आधीच येऊन बसलेला असतो.
अर्जुन सांगतो की मी आता कामावर निघत आहे तेव्हा आर्या सांगते की, आजचा दिवस तू माझ्याबरोबर राहावं अशी माझी इच्छा आहे. असंही पोलीस स्टेशनला तसं काही काम नाही आणि तसेच काही असेल तर चिंचुके बघून घेतील. मात्र इतक्यातच अमोलही तिथे येतो. तेव्हा अमोल सांगतो की, बाबा तू अजून कामावर गेला नाहीस का?, तेव्हा रूपाली सांगते की, आज अमोल भावोजी आर्याबरोबरच तिची काळजी घ्यायला राहणार आहेत हे ऐकल्यावर अमोल सांगतो की, बाबा तू कामावर जा. आई तू पण कामावर जा.
आर्या मावशीची काळजी घ्यायला मी आहे ना. तुम्ही काहीच काळजी करु नका असं म्हणून तो दोघांनाही कामावर पाठवतो. तर इकडे रूपाली आर्याला अमोल पासून सावध राहण्यास सांगते. आता अमोल रूपाली आर्याची कशी फजिती करणार, त्या दोघींची कशी तो दमछाक करणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.