‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अमोल व अर्जुनच्या वडिलांनी मिळून एक प्लॅन केलेला असतो. अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केलेला असतो. ते दोघे एकत्र कसे येतील यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. त्यातच त्यांचा राहिलेला प्लॅन ते करायचं ठरवतात. मात्र ही डेट प्लॅन ते घरच्या घरी करायचं ठरवतात आणि घरातल्यांना घेऊन ते त्यांच्या जुन्या घरी जायचं ठरवतात. तेव्हा जुन्या घरी जायचं असं सगळ्यांना सांगतात तेव्हा रूपालीला थोडासा संशय येतो. मात्र अप्पी व अर्जुनही डायरेक्ट तिकडेच येणार असल्याचं सांगितल्यावर रूपालीला विश्वास बसतो आणि सगळेजण तिकडे जायला निघतात. (Appi Amchi Collector Serial Update)
तर इकडे अमोल ने अप्पीला फोन करुन थोडीफार हिंट दिलेली असते. त्यानंतर अप्पी घरी आल्यानंतर बघते तर घरात कोणीच नसतं. तेव्हा तिच्या लक्षात येतं की, आता बाबासुद्धा माझी साथ द्यायला तयार आहेत. मी त्यांना थोडं कोऑपरेट करायला हवं. आज ही वेळ घालवून चालणार नाही. त्यानंतर अर्जुन येतो अर्जुन पाहतो तर घरात कोणीच नसतं आणि सजावट केलेली असते. त्यावेळेला अप्पी साडी नेसून अर्जुनच्या समोर येते. अप्पीला पाहून अर्जुन निशब्द होतो आणि हे सगळं काय सुरू आहे असे विचारतो. तेव्हा अप्पी सांगते की, अमोलची राहिलेली डेट मी पूर्ण करणार आहे. अमोल साठी आपण एकत्र यायला हवं असं मला वाटतं. मात्र अर्जुन या सगळ्याला तयारच नसतो.
अर्जुन सांगतो की मला तुझ्याकडे बघायची सुद्धा भीती वाटते. आता माझं लग्न ठरलं आहे. साखरपुडाही झाला आहे. आपल्यात पुन्हा प्रेम होणं शक्य नाही. यावर अप्पी सांगते की, मी तुझीच बायको आहे. त्यामुळे तू मला हक्काने बघू शकतोस त्यानंतर अप्पी अर्जुनजवळ येते आणि सांगते की, काही वेळासाठी आपण आपला भूतकाळ विसरून जाऊया आणि अमोल आपल्या आयुष्यात येणार होता तो काळ आठवूया का हे ऐकल्यावर अर्जुनही काहीच बोलत नाही. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अप्पी अर्जुनला प्रपोज करते.
अप्पी अर्जुनला म्हणते की, माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे आणि मला तू अमोल आणि मी एकत्र राहायला हवं असं वाटत आहे. हे ऐकल्यावर अर्जुनला काही सुचत नाही. तर तितक्यात आर्यादेखील तिथे पोहोचलेली असते आणि ती सगळं काही पाहते आणि तिला देखील धक्का बसतो. आता अर्जुन यावर काय उत्तर देणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.