मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्याअ मनावर राज्य करणारी झालेली लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. या जोडीने अनेक हिट चित्रपट देत आजवर मराठी व हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची लाडकी लेक श्रिया पिळगांवकरदेखील या अभिनय क्षेत्रात आली आहे. ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माईंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’ अशा अनेक वेबसीरिजमध्ये दमदार भूमिका साकारत श्रियाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आपल्या नानाविध भूमिका व अभिनयाने चर्चेत राहणारी श्रिया सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या आजोबांच्या वाढदिवसाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रियाचे आजोबा डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘तूम जिओ हजारों साल’ या गाण्यावर ते कुटुंबियांबरोबर थिरकत आहेत.
तसेच या व्हिडीओमध्ये श्रियाची आई म्हणजेच सुप्रिया पिळगावकरही पाहायला मिळत आहे. आजोबांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांनी जंगी सेलिब्रेशन केले असून त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. “मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना. आजोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे” असं म्हणत श्रियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. श्रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओलं अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरालाही ‘अंगारो सा…’ गाण्याची भुरळ, हुकस्टेपने वेधलं लक्ष, भुवनेश्वरीही कमेंट करत म्हणाली…
तसेच अनेक कलाकारांनीही या व्हिडीओवर कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. निवेदिता सराफ यांनी या व्हिडीओखाली कमेंट करत “श्रिया माझ्या वतीने आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दे, ते खूप भाग्यवान आहेत की त्यांना तुझ्यासारखी नात आहे”. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली श्रियाच्या आजोबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – बाप तसा लेक! अविनाश व ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो इतका सुंदर, Unseen Photos समोर
दरम्यान, श्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच भुवन बामच्या ‘ताजा खबर’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.