बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला शिकवीन…’मधील अधिपती लेकीला देतो अधिकाधिक वेळ, मुलगी दिसते फारच क्युट, नावही ठेवलं आहे अगदी युनिक

Saurabh Moreby Saurabh More
जून 17, 2024 | 1:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada fame adhipati aka Hrishikesh Shelar share photo with her daughter

'तुला शिकवीन…'मधील अधिपती लेकीला देतो अधिकाधिक वेळ, मुलगी दिसते फारच क्युट, नावही ठेवलं आहे अगदी युनिक

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे अभिनेता ऋषिकेश शेलार सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये त्याने अधिपती हे पात्र साकारलं आहे. तर अक्षराची भूमिका शिवानी रांगोळेने केली आहे. याशिवाय अक्षरा-अधिपतीची जोडीसुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

अधिपती म्हणजेच अभिनेता ऋषिकेश शेलारला काही महिन्यांपूर्वीच कन्यारत्न प्राप्त झालं. त्यानंतर त्याने मोठ्या धूमधडाक्यात लेकीचं बारसं केलं. यावेळी त्याने आपल्या लेकीचे नाव ‘रुही’ असं ठेवलं. ऋषिकेश आपल्या लाडक्या लेकीबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. या फोटोमधून त्याचा लेकीबरोबरचा खास बॉण्ड कायमच दिसून येतो. अशातच त्याने नुकतेच त्याच्या लेकीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sneha Ashok Mangal(KATE) (@sneha_ashokmangal14)

कालच्या ‘फादर्स डे’निमित्त ऋषिकेशच्या पत्नीने तिच्या व लेकीच्या वतीने ऋषिकेशसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ऋषिकेशचे लेकीबरोबरकचे क्युट फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोसह तिने हटके कॅप्शनही लिहिलं आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “हॅप्पी फादर्स डे बाबा. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. रुहीबरोबर माझाही बाबा झालास त्यासाठी खुप खुप धन्यवाद ऋषिकेश. तू आमची जशी काळजी घेतोस तशी फक्त एक बापच घेऊ शकतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”.  

आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरालाही ‘अंगारो सा…’ गाण्याची भुरळ, हुकस्टेपने वेधलं लक्ष, भुवनेश्वरीही कमेंट करत म्हणाली…   

ऋषिकेश हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे तसेच त्याच्या लेकीचे अनेक फोटो शेअर करत असतो. त्याच्या फोटो व व्हिडीओसह त्याच्या लेकीबरोबरच्या फोटोला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. खास फोटोद्वारे ऋषिकेश त्याच्या लेकीवरचे प्रेम व्यक्त करत असतो. अशातच त्याची कालची पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – बाप तसा लेक! अविनाश व ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो इतका सुंदर, Unseen Photos समोर

दरम्यान, ऋषिकेशने यापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत दौलत हे खलनायकाचं पात्र साकारलं होतं. खलपात्रामध्येसुद्धा तो तुफान लोकप्रिय झाला होता. त्यासाठी त्याला भरपूर पुरस्कारांनी गौरवण्यातही आले. त्यानंतर आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत त्याच्यावर खलनायकावरून नायक साकारण्याची जबाबदारी येऊन पडली आणि त्याने ती जबाबदारी अगदी लिलया पार पडत आहे.

Tags: hrishikesh shelarmarathi entertainment newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
navri mile hitelarla

Video : 'नवरी मिळे…'मध्ये दिसणारं स्वयंपाक घर कॅमेऱ्यामागे नक्की कसं आहे?, शूटमध्येच किचनमध्ये बनवली कांदा भजी, Inside Video समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.