‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सात वर्षांच्या लीपनंतर अर्जुन व अप्पी समोरासमोर आलेले पाहायला मिळाले. तर अप्पी व अर्जुन यांचा मुलगा अमोल असल्याच सत्य अद्याप अर्जुनसमोर आलेलं नसतं कारण अप्पीने अर्जुनला वचन दिलेलं असतं की, काही झालं तरी तुझ्याबद्दल मी आपल्या लेकाला काही सांगणार नाही आणि अप्पी ते वचन पाळत असते. मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, अर्जुनची वहिनी अप्पी पुन्हा कदमांच्या घरात येऊ नये म्हणून नवीन चाल आखते आणि अर्जुनच्या नावे परस्पर घटस्फोट पेपर्स तिला पाठवून देते. (Appi Amchi Collector Promo)
घटस्फोट पेपर्स पाहून अप्पीच्या पायाखालची जमीन सरकते. अप्पीचा गैरसमज होतो की हे घटस्फोटाचे पेपर्स अर्जुनेच पाठवले आहेत. त्यानंतर अर्जुनच्या वडिलांची तब्येत अचानक खालावते तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येते. तेव्हा अप्पी आणि तिथे बाबा त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा देखील अर्जुनची आणि अप्पीची भेट होते. तेव्हा अप्पी घटस्फोट पेपर्सबद्दल अर्जुनशी बोलते. मी लवकरात लवकर पेपर सह्या करून तुला पाठवते असंही ती म्हणते. त्यावेळेला अर्जुन बरोबर त्याची सहकामगार आर्या देखील असते तेव्हा अर्जुन आर्याची अप्पीसह ओळख करुन देतो.
अर्जुनची वहिनी अप्पीला अर्जुनपासून लांब राहण्यास सांगते आणि बोलते. आता त्यांचं लग्न ठरलं आहे त्यामुळे तू लांब राहा. तर एकीकडे आर्याने अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते त्यामुळे अर्जुनच्या वडिलांची अर्जुनने पुन्हा लग्न करावी ही इच्छा असते. केवळ वडिलांच्या हट्टापायी अर्जुन लग्नाला तयार होतो. त्यानंतर आता मालिकेचा नवा प्रोमोसमोर आला आहे.
मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुनची वहिनी अप्पीच्या घरी येते तेव्हा अप्पी कामावर जात असते. तेव्हा तिला पाहून ती म्हणते, “वहिनी तुम्ही इथे?”, त्यावर वहिनी सांगते, “हो मी आलेला चालेल ना?, नाही मी तुला घरात घेतलं नव्हतं ना, मला वाटलं तू मला देखील इथेच उभं करशील”, यावर अप्पी नाही असं म्हणत त्यांना घरात बोलावते. तितक्यात घरातील सगळीच मंडळी जमतात. तेव्हा अर्जुनची वहिनी सांगते की, “मी इथे एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला आली आहे”. यावर ती आर्या व अर्जुनच्या साखरपुड्याची पत्रिका आणली असल्याचे सांगते. हे पाहून अप्पीला खूप मोठा धक्का बसतो. आता अर्जुन आर्याचा साखरपुडा होणार का?, अप्पी-अर्जुन कायमचे वेगळे होणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.