गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारू-आदित्यचा शाही विवाहसोहळा संपन्न, ऍड शूटसाठी केलेलं लग्न मालिकेत कोणतं वळण घेणार?, नवा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

पारू-आदित्यचा शाही विवाहसोहळा संपन्न, ऍड शूटसाठी केलेलं लग्न मालिकेत कोणतं वळण घेणार?, नवा ट्विस्ट

‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू आणि हरीश यांचं लग्न होणार असतं मात्र दिशा आणि दामिनी डाव आखत हरीशला तिथून गायब करतात. त्यामुळे आदित्यवर मोठं संकट ओढवलेलं असतं. तर परदेशी कंपनीच्या मालकीण असतात त्यांच असं म्हणणं असतं की, काही झालं तरी हे शूट व्हायला हवं. त्यावेळेला त्यांची सेक्रेटरी आदित्यला म्हणते की, काही झालं तरी हे शूट व्हायला हवं नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल आणि अहिल्यादेवींनी आम्हाला शब्द दिला आहे त्यांचा शब्द हा इंडस्ट्रीमध्ये प्रमाण मानला जातो नाहीतर त्यांच्या शब्दाला काहीच व्हॅल्यू राहणार नाही. हे ऐकल्यावर आदित्यला आणखीनच टेन्शन येतं. (Paaru Serial Update)

तेव्हा त्या परदेशी कंपनीच्या मालक आदित्यला तूच नवरा मुलगा म्हणून तयार हो असा सल्ला देतात. तुझी आणि पारूची जोडी शोभेल असंही त्या म्हणतात. यावर आदित्य नकार देतो तर प्रीतमला ही गोष्ट पटते. प्रीतम आदित्यला बाजूला घेऊन जातो आणि समजावून सांगतो. मात्र आदित्य काही केल्या हे असं आईच्या विरोधात जाऊन करायला तयार नसतो. तेव्हा प्रीतम सांगतो की, आईला तू फोन कर आणि सगळी परिस्थिती सांग. जेव्हा तो फोन लावतो तेव्हा त्या बिझी असतात म्हणून तो आत्याला फोन लावतो. तेव्हा कळतं की, अहिल्यादेवी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहेत आणि त्यांना दोन तास कोणीही डिस्टर्ब करायचं नाही असा आदेश आलेला आहे. हे ऐकल्यावर आदित्यचं टेन्शन आणखी वाढतं. त्यानंतर काही केल्या आईचं नाव आणि किर्लोस्कर कंपनीची बदनामी होऊ नये यासाठी आदित्य स्वतः लग्नासाठी तयार होतो.

आणखी वाचा – “मी अजूनही,…”, बेपत्ता प्रकरणाबाबत ‘तारक मेहता…’मधील सोढीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “बेपत्ता होणं..”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ते पाहून दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. दामिनी हे असं करणं चुकीचं आहे असं सांगते मात्र प्रीतम तिला शांत करतो आणि म्हणतो की तू यात लुडबुड करू नकोस. तर इकडे आदित्य समोर उभा असतो तेव्हा नवऱ्या मुलीला बोलवण्यात येत आणि हे शूट बारा देशांमध्ये लाईव्ह पाहायला मिळणार असतं. नवरी मुलगी येते तेव्हा ती आदित्यला समोर हरीशच्या जागी पाहते. हे पाहून पारूला खूप मोठा धक्का बसतो कारण पारूला याची पूर्वकल्पना दिलेली नसते. तेव्हा प्रीतम जाऊन पारूला सगळी हकीगत सांगतो. तेव्हा त्यानंतर आदित्य ही पारूला प्लीज मला साथ दे. माझ्यावर विश्वास ठेव, असं सांगतो. तेव्हा पारू या लग्नाला तयार होते.

आणखी वाचा – “तापटपणा, आळशीपणा कमी करुन…”, लग्नाच्या सहा महिन्यानंतर प्रसाद जवादेचं बायकोच्या सवयींबाबत भाष्य, म्हणाला, “तिने स्वयंपाक…”

मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, हे ऍडशूटसाठीच लग्न अगदी थाटामाटात लागलेल असतं आणि सगळं काही ओके झालेलं असतं. त्यानंतर पारूकडून दागिने वगैरे काढून घेतात तेव्हा पारू गळ्यातील मंगळसूत्र काढायला नकार देते. आता हे ऍड शूटसाठी केलेले लग्न मालिकेत कोणतं वळण घेणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatepaaru weddingzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Chhaya kadam return to india

एअरपोर्टवर कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, भावुक झाल्या अन्…; 'कान्स'नंतर भारतात परतल्या छाया कदम, म्हणाल्या, "आता चिकन-भाकरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.