‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच रोहित परशुराम. रोहितने अर्जुन ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकेमुळेच रोहितला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली. अभिनयाबरोबरच रोहित सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. विशेषता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक अपडेट तो सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर करताना दिसतो. (Rohit Parshuram Daughter)
अशातच रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहितने शेअर केलेली ही पोस्ट एका खास व्यक्तीबरोबरची आहे. ती व्यक्ती म्हणजे त्याची लेक रुई. त्याने त्याच्या लेकीचा पहिला वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केलेला पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर त्याने त्याच्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोशल मीडियावरुन पहिला फोटो शेअर केला आहे. याआधी रोहितने लेक झाल्याची खबर चाहत्यांसह शेअर केली होती. मात्र त्याने त्याच्या लेकीचा चेहरा काही दाखवला नव्हता.
मात्र आता लेकीच्या पहिल्या वाढदिवसाला त्याने तिचा चेहरा साऱ्यांना दाखवला आहे. अगदी जवळचे नातेवाईक, कुटुंबीय यांच्या उपस्थितीत रोहित व पूजाने त्यांची लेक रुईचा पहिला वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. या व्हिडीओमध्ये केक कापताना रुई खूपच खुश असल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय ती तिच्या नातेवाईकांसहही खेळताना दिसली. रोहितने शेअर केलेला हा धमाल करतानाचा व्हिडीओ पाहून साऱ्यांनीच रोहितच्या या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. इतकंच नव्हे तर चाहत्यांनी कमेंट करत रुईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत.
अगदी कॉलेजपासून सुरु झालेल्या रोहित व पूजा यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. रोहित परशुरामच्या पत्नीचे नाव पूजा लक्ष्मण आव्हाड असं आहे. एक मॉडेल म्हणून पूजा ओळखली जाते. पूजा मुळची नाशिकची असून तिने पुण्यात शिक्षण घेतले आहे. तिला सुरुवातीपासूनच मॉडलिंगमध्ये रस होता. त्यामुळे तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.