रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर घटस्फोटाच्या कागदाचं सत्य आलं अप्पी व अर्जुनसमोर, वहिनीचा डाव उधळत दोघेही एकमेकांना स्वीकारणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2024 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Appi Amchi Collector

अखेर घटस्फोटाच्या कागदाचं सत्य आलं अप्पी व अर्जुनसमोर, वहिनीचा डाव उधळत दोघेही एकमेकांना स्वीकारणार का?

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत आलेल्या रंजक वळणाने साऱ्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अमोलच्या हट्टापाई अर्जुन अमोल जवळच राहतो तर इकडे आर्यानं त्याच्यासाठी डेट प्लॅन केलेला असतो. आर्या त्याची आतुरतेने वाट पाहत असते तर इकडे अमोलने सांगितलेलं असतं की, तू जर निघून गेलास तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. आधीच सात वर्षांचा दुरावा आणि त्यात पुन्हा बोलणार नाही असं सांगितल्यावर अर्जुनचा तिथून पाय निघत नाही. अर्जुन अप्पीला समजावण्याचा प्रयत्न करतो, मात्र अप्पी सुद्धा म्हणते की मी तुमच्या बाप बेटेमध्ये काहीच बोलणार नाही. आधीच सात वर्ष तुमच्यातला दुरावा खूप मोठा होता त्यामुळे आता मी काहीच बोलणार नाही. (Appi Amchi Collector)

तर इकडे अमोलही हट्टाला पेटलेला असतो की, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे. तुम्ही इथून जाता कामा नये. यावर अर्जुन तिथंच थांबण्याचा निर्णय घेतो. तर त्यानंतर अमोल त्याच्या माँ-बाबा आणि अप्पी-अर्जुनमध्ये बॅडमिंटनची स्पर्धा लावतो आणि सांगतो की, ही स्पर्धा माझे माँ-बाबा जिंकणार आणि अमोलने सांगितल्याप्रमाणेच ही स्पर्धा माँ- बाबा जिंकतात. त्यामुळे अर्जुन अमोल खूपच खुश होतो. अमोल खूप आनंदात असतो आणि तर इकडे अर्जुनला आर्याचे दहा मिस कॉल आलेले असतात म्हणून तो आर्याला फोन लावतो. अर्जुन आर्याशी बोलायला जातो तितक्यातच अमोलला चक्कर येते म्हणून तो फोन चालूच ठेवतो आणि अमोल कडे धावून येतो. त्यानंतर अमोलने हे नाटक केलेलं असतं. अमोलला घरात आणतात तेव्हा अमोलला बरं वाटू लागतं मात्र अप्पी आणि अर्जुनला काळजी वाटू लागते की, अमोलला अशी सतत चक्कर का येते. दुसऱ्या दिवशी सगळेजण खूप खुश असतात तेव्हा अर्जुन सांगतो की मला आता कामासाठी बाहेर जावं लागेल पण मी संध्याकाळी पुन्हा येतो.

आणखी वाचा – अहिल्यादेवींसमोर पारू पुन्हा खोटं बोलणार, मनातील लग्नाचं सत्य लपवून ठेवलं आणि…; मोठा ट्विस्ट

तितक्यातच घरा बाहेर एक गाडी येते आणि जोर जोरात हॉर्न वाजवू लागते. त्या गाडीतून अर्जुनचे बाबा, भाऊ आणि वहिनी आणि आर्या व तिची आई उतरते आणि सगळेजण घरात येतात. त्यानंतर आर्याची आई अर्जुनला खूप काही बोलते आणि सांगते की माझी पोरगी रात्री एकटी तिकडे तुझी वाट बघत होती पण तू काही परत आला नाही आणि तुला इथे तुझ्या पहिल्या बायकोबरोबर राहायचं आहे. इतकंच होतं तर तू आश्वासन का दिलं?, आतापर्यंत तू तिला गृहीत धरत आलाच आहेस आणि आता तर हद्दच पार केलीस हे सगळं ऐकत असताना अर्जुन त्यांची माफी मागतो. मात्र त्या काहीच ऐकून घेत नाही आणि आर्याही अर्जुनला खूप काही बोलते. तितक्यात अर्जुनचा भाऊ म्हणतो की अर्जुनचा भाऊ म्हणतो की, सात वर्ष तुम्हाला याची आठवण आली नाही आणि डिओर्स पेपरही तुम्हीच पाठवले ना?, यावर अप्पी सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की, डिओर्स पेपर मी पाठवले नाही आहेत.

आणखी वाचा – ते’ सांकेतिक वाक्य रुपालीला समजणार, विरोचकाविरुद्ध विणलेल्या जाळ्यात राजाध्यक्ष स्वतःच अडकणार, नेत्रा वाचवू शकेल का?

घटस्फोटाचे पेपर मला अर्जुनकडून आलेले आहेत आणि ते मी सह्या करुन पाठवले आहेत. हे ऐकल्यावर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन सांगतो की, मी काही घटस्फोटाचे कागद तुम्हाला पाठवले नाहीत. मी गेली सात वर्ष तुझी वाट पाहत आहे तर मी घटस्फोटाचे कागद तुला का पाठवू?. यावर दीपेश सांगतो की आम्ही स्वतः या सगळ्याचे साक्षीदार आहोत की तुमच्याकडून घटस्फोटाचे कागद आमच्याकडे आले. हे नक्की कोणी केलं असा विचार करत दोघांनाही धक्का बसतो. मालिकेच्या पुढील भागात हे पाहायला मिळणार आहे की, अर्जुनची वहिनी सांगते की, हे घटस्फोटाचे कागद मी पाठवले आहेत. सत्य समोर आल्यावर आता दोघं काय निर्णय घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.

Tags: Appi Amchi CollectorAppi Amchi Collector serialmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Rohit Parshuram Daughter

इतकी सुंदर दिसते 'अप्पी आमची…'मधील अर्जुनची लेक, पहिल्या वाढदिवसाला दाखवला चेहरा, नावही आहे खूप खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.