सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहिल्यादेवींसमोर पारू पुन्हा खोटं बोलणार, मनातील लग्नाचं सत्य लपवून ठेवलं आणि…; मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2024 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

अहिल्यादेवींसमोर पारू पुन्हा खोटं बोलणार, मनातील लग्नाचं सत्य लपवून ठेवलं आणि…; मोठा ट्विस्ट

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू देवाच्या पाया पडते तितक्यातच तिथे सावित्री आत्या आलेल्या असतात. सावित्री आत्या पारूला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात मात्र पारू स्वतःचं दुःख सांगत सांगते की तुम्ही तरी माझ्याशी नीट बोला. माझ्याकडे तुमच्याशिवाय मन व्यक्त करायला, मन मोकळं करायला कोणीच नाही आहे यावर सावित्री आत्या पारूची बाजू समजून घेतले आणि त्या पारुला म्हणतात की, कोणी कितीही तुझ्यावर आरोप केले, तुला कितीही दोष दिला तरी मी तुझ्याबरोबर कायम शेवटपर्यंत असेल असा विश्वास दाखवतात.त्यानंतर त्या दोघी किर्लोस्कर बंगल्यात येतात. इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर आलेले असतात. अहिल्यादेवी चहा पीत असतात तितक्यात तिथे आदित्य येतो मात्र त्या आदित्यशी काहीच बोलत नाहीत तर बाहेरून दामिनी मला आत घ्या. मी रात्रीपासून बाहेरच आहे असं सारखं ओरडत असते. यावर मोहन तिला चांगली अद्दल घडवायला जात असतो मात्र श्रीकांत त्यांना थांबवतो आणि सांगतो की, घरची लक्ष्मी आहे ती तिला घराबाहेर असं ताटकळत ठेवणं बरं नाही, असं म्हणत तिला घरात बोलावून घेतो. (Paaru Serial Update)

त्यानंतर दामिनी घरात येते आणि थेट येऊन डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करु लागते आणि बोलते मला खूप भूक लागली आहे. मी कालपासून काहीच खाल्लं नाही आणि असं म्हणून ती फटाफट खाऊ लागते. तर इकडे पारू शिरा घेऊन येते. शिरा पाहून श्रीकांत म्हणतात, अरे वा गोडाचा शिरा केला आहेस का?, आदित्य आणि अहिल्याला प्रचंड आवडतो. तेव्हा अहिल्यादेवी उठतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर सगळेजण डायनिंग टेबलवरुन निघून जातात. तर दामिनी तिथे नाश्ता करतच बसलेली असते ती पारूला शिराही वाढायला सांगते. त्यानंतर पारू जेवण घेऊन अहिल्यादेवींच्या खोलीत जाते मात्र अहिल्या देवी भूक नसल्याचं सांगत तिला परत जायला सांगतो.

आणखी वाचा – ‘ते’ सांकेतिक वाक्य रुपालीला समजणार, विरोचकाविरुद्ध विणलेल्या जाळ्यात राजाध्यक्ष स्वतःच अडकणार, नेत्रा वाचवू शकेल का?

पारू परत जात असतानाच अहिल्यादेवी पारुला थांबवतात आणि सांगतात की, आदित्यने माझी तर फसवणूक केलीच आहे पण त्याने तुझीसुद्धा फसवणूक केली आहे. मी तुला चांगलं ओळखते. तू कोणत्या कुटुंबातून आली आहेस, तुझ्यावर कोणते संस्कार झाले आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. नशीब की या ऍड शूटच्या लग्नानं तुझ्या आयुष्यात कोणतं वादळ आलं नाही ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुला हे लग्न जाहिरातीतलं लग्न आहे हे मान्य होतं हे एक चांगलं झालं. तुला या लग्नाचा खरंच त्रास झाला नाही आहे ना? असा प्रश्न अहिल्यादेवी पारुला विचारतात. हा प्रश्न विचारून अहिल्यादेवींनी पारूला धर्म संकटातच टाकलेलं असतं. आता पारू यावर विचार करू लागते की, मी आता खरं उत्तर देऊ की खोटं उत्तर देऊ, पण खरं उत्तर दिलं तर अहिल्यादेवी आदित्य सरांचं तोंडही पाहणार नाहीत. आधीच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, ते एकमेकांशी बोलत नाही आहेत त्यामुळे मला खरं उत्तर देऊन चालणार नाही, असं म्हणून ती खोटं उत्तर देते की, हो हे सर्व काही मला माहित होतं आणि हे जाहिरातीतले लग्न आहे याची कल्पना आदित्य सरांनी दिली होती. मात्र यात आदित्य सरांची काही चूक नाही आहे, ही परिस्थितीच तशी होती यावर अहिल्यादेवी सांगतात की, ते काही असलं तरी मी त्याला कधीच माफ करणार नाही आणि असं म्हणून पारूला जायला सांगतात.

आणखी वाचा – इतकं भव्य आणि प्रशस्त आहे ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचं घर, हॉलमधील ट्रॉफी व बक्षिसांनी वेधलं लक्ष, पाहा Inside Video

तर इकडे आदित्य बॉक्सिंग करत सगळा राग काढत असतो तेव्हा दिशा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मात्र तो दिशाला मला थोडा एकांत हवा आहे असं म्हणत तिला जायला सांगतो. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, मारुती, हरीश, सावित्री, पारू मिळून एक प्लॅन करतात घरातले हे वातावरण पुन्हा खेळीमेळीचं होण्यासाठी मारुती हरीश व पारूचं केळवण करायचं ठरवतो. आता मालिकेत पुढे काय होणार आहे हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Marathi actress Vishakha Subhedar shared a video on Instagram saying i am fat

Video : “जाड आहे या गोष्टीचा...”, विशाखा सुभेदारांच्या ‘त्या’ व्हिडीओची चर्चा, नेटकरीही कमेंट करत म्हणाले, “तुम्ही जशा आहात...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.