शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘अप्पी आमची…’ मालिकेतील सिंबालाही पडलीय ‘पुष्पा-२’च्या ‘अंगारो सा…’ गाण्याची भुरळ, चिमुकल्यापुढे अल्लू अर्जुनही फेल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 11, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sairaj kendre sami sami dance

Video : 'अप्पी आमची…' मालिकेतील सिंबालाही पडलीय ‘पुष्पा-२’च्या ‘अंगारो सा…’ गाण्याची भुरळ, चिमुकल्यापुढे अल्लू अर्जुनही फेल

सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सर्वत्र चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील सामी सामी हे गाणं तुफान व्हायरल होताना दिसत आहे. रश्मिका मंदांना आणि अल्लू अर्जुनच्या या गाण्याने आणि डान्स स्टेपने साऱ्यांना भुरळ घातली आहे. ही डान्स स्टेप प्रचंड व्हायरल झाली असून अनेकांनी ही स्टेप फॉलो करत रील शेअर केले आहेत. तर कलाकार मंडळींनाही या गाण्याने भुरळ घातलेली पाहायला मिळत आहे. (sairaj kendre sami sami dance)

पारू या मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर केलेला डान्स चर्चेत राहिला. तर यानंतर आता ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील कलाकारांनाही सामी सामी गाण्याची भुरळ पडली आहे. मालिकेतील सर्वांचा लाडका बालकलाकार साईराज केंद्रे म्हणजेच अमोल उर्फ सिंबालाही ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या गाण्याने वेड लावलं आहे. या गाण्यावर साईराजने केलेली रील व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. याआधीही साईराज ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’, या गाण्यावरील डान्समुळे चर्चेत आला होता.

आणखी वाचा – वडिलांचा विरोध, प्रेमविवाह अन्…; लग्नाच्या पाच वर्षांनी ‘या’ कलाकार जोडीचा घटस्फोट, अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप

View this post on Instagram

A post shared by Sairaj Ganesh Kendre (@ganeshkendre7707)

साईराजचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहतावर्ग आहे. साईराजने सामी सामीवर केलेला डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. साईराज हा उत्तम डान्सर असून त्याला नृत्याची आवड आहे. अगदी हुबेहूब हुक स्टेप फॉलो करत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. नृत्यासह साईराजने आजवर त्याच्या अभिनयानेही प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

आणखी वाचा – ‘मुरांबा’नंतर फारसे चित्रपट न केल्याबद्दल चिन्मयी सुमित यांचे वक्तव्य, म्हणाल्या, “घरासमोर निर्मात्यांच्या रांगा…”

सध्या साईराज ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. अप्पी व अर्जुनमध्ये आलेला दुरावा दूर करण्यासाठी अमोल प्रयत्न करताना दिसत आहे. मालिकेतील अमोलच्या भूमिकेचं आणि अभिनयाचंही चाहते कौतुक करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना साईराजला छोट्या पडद्यावर पाहणंही रंजक ठरत आहे.

Tags: Angaro Ka Ambar Sa Lagta Hai Mera Samiappi amachi collectorsairaj kendresairaj kendre sami sami dance
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Sonakshi Sinha reacted herself on the marriage news with boyfriend Zaheer Iqbal.

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची तारीख समोर, अखेर लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, "आई-वडिलांपेक्षा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.