रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची तारीख समोर, अखेर लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, “आई-वडिलांपेक्षा…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 11, 2024 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sonakshi Sinha reacted herself on the marriage news with boyfriend Zaheer Iqbal.

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची तारीख समोर, अखेर लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, "आई-वडिलांपेक्षा..."

‘हिरामंडी’ या लोकप्रिय सीरिजमधून चर्चेत आलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. येत्या २३ जून रोजी सोनाक्षी तिच्या कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करणार असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरला होत आहेत. यावर सोनाक्षीने तिची प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र स्वत:च्या लग्नाच्या अनेक चर्चांनंतर सोनाक्षीने मौन सोडलं आहे. याबद्दल बोलताना ती तिच्या लग्नाच्या प्रश्नांकडे फारसे लक्ष देत नाही. तसेच त्यांच्या लग्नाशी इतरांचा संबंध नसावा असंही म्हटलं.

सोनाक्षी सिन्हाने DWA ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “मला हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र मी नेहमीच एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. सर्वप्रथम, माझ्या लग्नाशी कोणाचाही संबंध नसावा. दुसरे म्हणजे, ही माझी निवड आहे. मग मला कळत नाही की, लोक इतकी काळजी का करतात?. माझ्या आई-वडिलांपेक्षा लोक मला माझ्या लग्नाबद्दल जास्त विचारतात. म्हणूनच मला ते खूप गंमतीशीर वाटते. आता मला त्याची सवय झाली आहे. त्याचा मला त्रास होत नाही. लोक माझ्या लग्नाबद्दल उत्सुक आहेत, आम्ही त्याबद्दल काय करु शकतो?”

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

आणखी वाचा – घायल शेर लौट आया है! ‘मिर्झापूर ३’चा जबरदस्त टीझरची चर्चा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

तसेच सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत असं म्हटले आहे की, “मी माध्यमांमध्ये जेवढे वाचले आहे तेवढेच मला माहीत आहे. माझ्याकडे अद्याप याविषयी कोणतीही माहिती नाही. लोक मला सोनाक्षीच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत. पण मला याबद्दल काहीच माहिती नाही आणि मीडियाला सर्व काही माहित आहे. यावर मी एवढेच सांगू इच्छितो की, आजकालची मुले त्यांच्या पालकांना विचारत नाहीत, ते फक्त येऊन सांगतात. पण माझे आशीर्वाद कायमच तिच्याबरोबर असतील”.

आणखी वाचा – ‘मुरांबा’नंतर फारसे चित्रपट न केल्याबद्दल चिन्मयी सुमित यांचे वक्तव्य, म्हणाल्या, “घरासमोर निर्मात्यांच्या रांगा…”   

‘हीरामंडी’च्या प्रमोशनदरम्यान सोनाक्षीने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये ती लग्नासाठी उत्सुक आहे असं वक्तव्य केलं होतं. यामुळे तिच्या व इकबल झहीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा व  झहीर इक्बाल यांनी २०२२मध्ये ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. सोनाक्षीला सलमानने चित्रपटांमध्ये लाँच केले होते. त्याचबरोबर झहीर इक्बालने पदार्पण केलेला ‘नोटबुक’ हा चित्रपटाला सलमान खानची निर्मिती होती. तसेच झहीर इक्बाल व सोनाक्षी यांची पहिली भेट सलमानच्या एका पार्टीत झाली होती.

Tags: Bollywood entertainment newssonakshi SinhaZaheer Iqbal
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Himesh Reshammiya had a second marriage with his first wife's friend

मैत्रीणच झाली सवत! हिमेश रेशमियाने पहिल्या बायकोच्या मैत्रीणीबरोबरच थाटला होता दूसरा संसार, पत्नीनेच करून दिली होती ओळख

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.