झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही मालिका अमोलच्या आजारपणामुळे नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या प्रत्येक सगळ्या इच्छा आणि हट्ट पूर्ण करत आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अमोलच्या हट्टापायी अर्जुन व अप्पी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आनंदी वातावरण होते. अमोलच्या आजारपणाचे संकट असतानाच आता अप्पी-अर्जुन यांच्या आयुष्यात एक आणखी नवीन संकट येणार आहे. या नवीन संकटाचा सामना हे दोघे कसा करणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. (appi amchi collector serial update)
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अप्पी अर्जुनावर जीजी नावाचं संकट येणार असल्याची चाहूल लागली आहे. अप्पी जेव्हा जीजीबरोबर बालमजुरी प्रकरणावर भिडते, तेव्हा तो त्या गोष्टीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करतो. तो सांगतो की त्याच्या एका माणसाने हे कृत्य केलं आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात मी देत आहे. जीजी आपलं नाव साफ ठेवत प्रसारमाध्यमांना सांगतो की, त्याने पोलिसांना मदत केली आहे. यामुळे अप्पी आणि अर्जुन चिंतेत आहेत.
आणखी वाचा – “लोकांचे जीव जात आहेत आणि…”, मांजामुळे तरुण मुलाचा मृत्यू, जितेंद्र जोशी भडकला, म्हणाला, “हिंदू सण…”
आर्याच्या मदतीने ती एका पत्रकाराला माहिती लीक करते की एक मुलगा जीजी विरोधात साक्ष देणार आहे आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवले जाणार आहे. ही बातमी ऐकून जीजी हादरतो. जीजी आपल्या गुंडांना त्या मुलाला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचे आदेश देतो. त्या रात्री, गुंड मुलाला सोडवण्यासाठी येतात, पण अप्पी, अर्जुन आणि चिंचुके त्यांना रंगेहाथ पकडतात.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या मुलांची शाळेत तोडफोड, मध्या-आभ्याला कांबळे सर साथ देणार का?
दुसऱ्या दिवशी, अप्पी आणि अर्जुन जीजीला अटक करण्यासाठी जातात. जीजी त्यांच्याविरुद्ध बदला घेण्याची शपथ घेतो. त्यामुळे आता अर्जुन आणि अप्पीवर एक नवीन संकट येणार आहे. आता हे संकट कोणतं असणार? या संकटातून अप्पी-अर्जुन कसं बाहेर पडणार? हे लवकरच पहायला मिळणार आहे. या सगळ्यात अमोलवर या संकटाचं सावट पडणार का? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.