‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. शिव ची गौरी म्हणून सायलीला या मालिकेमुळेच खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेपासून सायलीने तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरु केला. एखादया विषयाचं ज्ञान घेण्यासाठी झटणारी सायली नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडते. छोटा पडदा गाजवल्यानंतर सायलीने तिची पावलं सिनेइंडस्ट्रीकडे वळविली. (sayali sanjeev about politics)
‘मन फकिरा’, ‘झिम्मा’ या चित्रपटांमध्ये सायलीने महत्वपूर्ण भूमिका साकारली. त्यांनतर सायली ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटात सायलीने इंद्रायणी हे पात्र साकारले होते. आशयघन कथा असलेल्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सायलीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा अवार्ड देखील मिळाला.
पहा सायली नवीन काय शिकतेय – (sayali sanjeev about politics)
सायली सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सायलीने नुकत्याच झालेल्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या रेड कार्पेट दरम्यान सायलीचा मनमोहक अंदाज अधिकांश लक्षवेधी होता. सोज्वळ, सुजाण, सुसंस्कारी अशी सायली पैठणी नेसलेल्या साडीत उठून दिसत होती. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखती दरम्यान तिने नेसलेल्या पैठणीचं विशेष कौतुक केलं. आणि सांगितलं की ही पैठणी तिला निवेदिता सराफ आणि अशोक सरांनी खास आणली आहे.
====
हे देखील वाचा – आईच्या पाठवणी वेळी मुलं झाली भावुक
====
‘झी चित्र गौरव’ च्या पुरस्कार सोहळ्याचे औचित्य साधत सायलीने निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी घेतलेली पैठणी नेसली होती. त्यावेळी तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, यंदाच्या वर्षात तुझ्या कोणत्या बातमीची चर्चा व्हायला हवी असं तुला वाटतंय? यावर सायलीने असे म्हटले की, ‘मी राज्यशास्त्राचा अभ्यास करतेय, मी मास्टर करतेय एम ए इन पॉलिटिकल सायन्स मध्ये तर याची चर्चा यंदाच्या वर्षात रंगू शकते. सायली अभिनयासोबतच शिक्षणही घेतेय ही वाखाणण्याजोगी बाब आहे.(sayali sanjeev about politics)

सायली सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि ती चाहत्यांसोबत संपर्कातही असते. काही दिवसातच प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटात सायली पाहुणे कलाकार म्हणून पाहायला मिळणार आहे. तर ‘झिम्मा २’ या आगामी चित्रपटातही सायली झळकणार आहे. सायली तिच्या सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटचे फोटो शेअर करून सगळ्यांनाच नेहमी घायाळ करते. सायलीच्या फोटोशूटची चर्चा कायमच रंगलेली असते.
आता सायली राज्यशास्त्राचा अभ्यास का करतेय? तिला राजकारणाची आवड आहे का? राजकारणात तिला प्रवेश करायचाय का? अशा चर्चा नक्कीच रंगतील.
