गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Breast Cancer मुळे हिना खानला मरण यातना, देवाकडे सतत करत आहे प्रार्थना, पोस्ट शेअर करत म्हणाली, “हे अल्लाह कृपया…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 11, 2024 | 12:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hina Khan On Terrible Pain

Breast Cancer मुळे हिना खानला मरण यातना, देवाकडे सतत करत आहे प्रार्थना, पोस्ट शेअर करत म्हणाली, "हे अल्लाह कृपया..."

अभिनेत्री हिना खान सध्या खूप कठीण परिस्थितीतून जात आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही काळापूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली होती. सध्या अभिनेत्रीवर उपचार सुरु आहेत. हिनाला तिसऱ्या स्टेजचा स्तनाचा कर्करोग आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने कोणीही घाबरुन जाईल आणि हिनाही पूर्णपणे घाबरली असावी, पण तिने केवळ धैर्य राखले नाही तर लोकांना प्रेरणा आणि जागरुक करण्याचे ठरवले. पण आता तिला खूप वेदना होत असल्याचं दिसत आहे. (Hina Khan On Terrible Pain)

हिना खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिला भयंकर वेदना होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अल्लाहचे स्मरण करत तिने लिहिले आहे की, “अल्लाहशिवाय कोणीही तुमचे दुःख दूर करु शकत नाही. प्लिज अल्लाह, प्लिज”. याबरोबर तिने एक भावनिक इमोजीही शेअर केला आहे. हिना खानने अलीकडेच तिला कॅन्सर झाल्याचे कसे कळले याबाबत सांगितले. अभिनेत्रीच्या आजारपणाबाबत कळताच सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी तिला पाठिंबा दिला.

आणखी वाचा – त्रिनयना देवीकडून नेत्राला कुंकवाच्या पाऊलांचे शुभसंकेत, नेत्रा विरोचकाचा सामना करणार का? देवीआईच्या मनात नक्की काय?

३६ वर्षीय हिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि सांगितले होते की, ती अनेकदा आजारी पडू लागली होती आणि तिला वारंवार ताप येत होता. डॉक्टरांकडे गेल्यावर तिला कॅन्सरची तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. हे ऐकून हिनाच्या पायाखालची जमीनच सरकली. पण यावेळी तिने कसेतरी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आता अभिनेत्रीवर केमोथेरपी सुरु झाली. या मोठ्या आजाराशी लढण्याची ताकद हिनाला मिळो यासाठी तिचे चाहतेही प्रार्थना करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटावरुन ट्रोल करणाऱ्यांना पत्नीची समज, ट्रोलर्सला फटकारलं आणि…; म्हणाली, “कोणत्या परिस्थितीतून…”

हिनाने किमोथेरपी घेण्यापूर्वी तिचे केसही कापले. तिची अवस्था पाहून आईलाही अश्रू अनावर झाले आणि आपल्या मुलीसाठी तिनेदेखील प्रार्थना केली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमधून अक्षराच्या भूमिकेतून हिना खान घराघरात प्रसिद्ध झाली. याशिवाय तिने अनेक वेबसीरिज व म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे.

Tags: bollywood actresshina khan cancerHina Khan On Terrible Paintv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
sonakshi sinha viral video

"आता लग्न नाही झालं आणि तुझे असे हाल", सोनाक्षी सिन्हाला 'त्या' अवस्थेमध्ये बघून भडकले नेटकरी, असं नक्क काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.