Anurag Kashyap Daughter Wedding : दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्याच्या लेकीच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. बरेच दिवसांपासून अनुरागच्या लेकीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. लग्नापुर्वीच्या विधींचे आणि सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळाले. अशातच आता अनुराग कश्यपच्या लेकीचा अगदी थाटामाटात लग्नसोहळा पार पडला असल्याचं समोर आलं आहे. शाही थाटामाटात हे लग्न पार पडलं असल्याचं फोटोंमधून समोर आलं आहे. अनुराग यांच्या लेकीचे ११ डिसेंबर रोजी लग्न झाले. तिने तिचा परदेशी बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरबरोबर मुंबईत सात फेरे घेतले आहेत. आलियाला नवरी मुलीच्या वेशात पाहून वडील अनुराग कश्यप यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
लेकीच्या लग्नात दिग्दर्शकाच्या डोळ्यात अश्रूही आले. लग्नावेळी आलिया, तिचा नवरा शेन ग्रेगोईरच्या स्वागताला लग्नाच्या मिरवणुकीत पोहोचली. वधू आलियाचे फोटो व व्हिडीओ देखील समोर आले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये आलिया कश्यप फुलांच्या चादरीखालून वराकडे जाताना दिसत आहे. शेन ग्रेगोयरने पीच रंगाची शेरवानी घातली होती आणि लग्नाच्या मिरवणुकीत तो नाचताना दिसला होता.
नवरा मुलगा सासरच्या घरी पोहोचताच त्याच्या सासऱ्यांनी म्हणजेच अनुराग कश्यप आणि त्याची माजी पत्नी आरती बजाज यांनी गेटवर त्याचे स्वागत केले आणि जावयाचे औक्षण केले. त्यानंतर अनुराग कश्यपने आपल्या जावयाला हार घालून मिठी मारली. यानंतर त्यांनी लग्नातील सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या लग्नाला खुशी कपूर, वैदंग रैना आणि इम्तियाज अलीशिवाय अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली होती. अनुराग कश्यपचे कुटुंबीय आणि नवविवाहित जोडप्याचे जवळचे मित्रही या लग्नात सहभागी झाले होते.
आणखी वाचा – ‘आई कुठे…’मधील कलाकारांनी साजरं केलं कौमुदी वलोकरचं केळवण, लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो तुफान व्हायरल
आलियाने लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा आणि बांगड्या घातल्या होत्या, ज्यामध्ये ती राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती. आलियाच्या सर्व मित्रांनी तिला फ्लॉवर बेडच्या सावलीत लग्नाच्या हॉलमध्ये नेले, जिथे नवरा मुलगा तिची वाट पाहत होता. या लग्नाला अनुराग कश्यपची दुसरी माजी पत्नी कल्की केकलनंही हजेरी लावली होती.