मनोरंजन सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे चित्रपट, मालिका, नाटक अशा अनेक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. यापैकी एक प्रसिद्ध अभिनेते म्हणजे अनुपम खेर. आज अनुपम खेर यांचा वाढदिवस. आज आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अनुपम यांना एकेकाळी दिसण्यावरून अनेक भूमिकांना मुकावं लागलं. याबाबत त्यांनी ‘आप कि अदालत’ या कार्यक्रमा दरम्यान खुलासा केला होता. अनुपम यांनी सांगितलं “वयाच्या २६-२७ व्या वर्षी मी कामाला सुरुवात केली पण कमी केसांमुळे मला अनेक भूमिकांसाठी नकार मिळाला तेव्हा मी खूप निराश झालो. (Anupam Kher Struggle Story)
सुरुवातीच्या काळात खिशात केवळ ३७ रुपये घेऊन अनुपम यांनी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्यांना सुरुवातीला कुठेही राहण्यासाठी जागा नव्हती तेव्हा त्यांनी रेल्वे स्टेशनवर पेपर अंथरूण दिवस काढले. त्यानंतर एके ठिकाणी नोकरी मिळाल्यानंतर अनुपण यांनी त्यांच्या पहिल्या पगारातून मुंबईत २००० रुपयांवर एक घर भाड्याने घेतले. अभिनय शिकवताना त्यांना कुठेतरी लहान लहान भूमिका देखील मिळायच्या. त्यावेळी त्यांनी ‘आगमन’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आणि त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना दिवसाला २००० रुपये इतके मानधन देखील मिळायचे.

कमी केसांमुळे माझ्या अनेक भूमिका गेल्यानंतर केस परत यावे म्हणून मी खूप प्रयत्न केले. विविध प्रकारच्या जडीबुटी वापरल्या, पौष्टिक अन्न, निरनिराळी औषधं यांचा वापर केला.एवढंच नाही तर मी ४-४ दिवस केसांना रिठा लावून ठेवायचो पण या गोष्टींचा काहीही फायदा झाला नाही. त्यावेळी मला कोणी तरी सांगितलं उंटाची लघवी डोक्याला लावल्याने केस येण्यासाठी मदत होते तेव्हा हतबल मनाने मी तो ही प्रयत्न केला. जुहू चौपाटीवर भर उन्हात मी एक प्लास्टिकची बॉटल घेऊन एका उंटाच्या मागे धावलो, खूप वेळ वाट बघितल्या नंतर मी उंटाची लघवी मिळवू शकलो. पण त्या नंतरही माझ्या हाती निराशाचा लागली.त्या गोष्टीनेही काही फरक पडला नाही.(Anupam Kher Struggle Story)
पुढे अनुपम म्हणाले “कमी केसांमुळे माझा चेहरा वयापेक्षा मोठ्या माणसासारखा दिसायचा त्यामुळे मला २७ वी वर्षी ७० वर्षाच्या वयाच्या भूमिका देखील केल्या. माझे केस लवकर जात असताना मी लोकांना काय वाटेल म्हणून टॅक्सिच्या काचा बंद करून सगळीकडे फिरायचो.” टक्कल पडल्यामुळे भूमिका गेल्या तरीही अनुपान खेर यांनी यांचा अभिनयाचा हा प्रवास बंद केला नाही. त्यांनी याच लूकमध्ये आता पुढे काम करायचं असा निर्णय घेतला आणि अनेक चित्रपटांमध्ये याच लूकसह उत्तम भूमिकाही निभावल्या. अनुपम यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल’, ‘सौदागर’, ‘हम आपके है कौन’, ‘तेजाब’, ‘राम लखन’ यांसारखे ५०० हून अधिक चित्रपट केले आहेत. (anupam kher movies)