छोट्या पडद्यावरील सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेची नायिका अरुंधती हिने मालिकेत अनिरुद्धसोबत घटस्फोट घेत आशुतोषशी लगीनगाठ बांधली. पण आता रील लाईफ अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर खऱ्या आयुष्यातही घटस्फोट देणार असल्याची चर्चा रंगताना दिसते. (madhurani prabhulkar divorce ?)
‘ई-टाइम्स’ला अभिनेत्रींच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आलंय की, मधुराणी तिचे पती प्रमोद प्रभुलकरपासून वेगळं होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मधुराणीने तिच्या पतीच्या ॲक्टिंग अकादमीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. ज्याची माहिती तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना दिली होती. त्याचबरोबर मधुराणीने तिच्या पतीच्या संबंधित सर्व प्रोजेक्टसमधून माघार घेतली.
मधुराणी काही महिन्यांपूर्वी आपल्या मुलीसह ऑस्ट्रेलिया येथे गेली होती. गेल्या दोन वर्षांपासून मधुराणी व तिचे पती प्रमोद यांचे एकत्र फोटोजही सोशल मीडियावर पाहायला मिळालेले नाही. दरम्यान वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे मधुराणी व तिच्या पतीने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे, असेही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यात मतभेद असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. पण सध्यातरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं असून हे सर्व पाहता हे दोघं घटस्फोट घेणार का ? याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. (madhurani gokhale prabhulkar)
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास मधुराणी सध्या ‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत बिझी असून तिचे पती प्रमोद प्रभुलकर हे सिने निर्माते व दिग्दर्शक आहे. शिवाय त्यांची एक ॲक्टिंग अकादमी सुद्धा आहे. (Akkk fame Madhurani will give divorce in real life ?)
हे देखील वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेला अरुंधती देणार होती नकार’