मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा नेहमीच ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. नुकताच सईचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसानिमित्त सईवर तिच्या चाहत्यांनी, मित्र मैत्रिणींनी सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व शुभेच्छांमध्ये सईला एका खास व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आल्या आहेत. या शुभेच्छा आहेत सईचा बॉयफ्रेंड अनिश जोगच्या. (Saie Tamhankar Anish Joag )
सई सध्या बॉयफ्रेंड अनिश जोगसोबत परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. ती फिरायला स्पेन येथे गेली आहे. तेथे जाऊन तिने अनेक फोटोस पोस्ट केले आहेत. सईचा बर्थडे साजरा करण्यासाठी ते स्पेनला गेले आहेत. सई आणि अनिश यांनी स्पेनमधील अद्याप एकत्र फोटो पोस्ट केला नसला तरी त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरून स्पेन येथे गेल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. आणि आता अनीशने सईच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केलेल्या व्हिडिओत त्यांचा दोघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे.
पाहा सईसाठीची अनिशची खास पोस्ट (Saie Tamhankar Anish Joag )
सईच्या वाढदिवसानिमित्त अनिशनं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सईचे न पाहिलेले फोटो पाहायला मिळत आहेत. दिल कह रहा है उसे…हे रोमॅन्टिक गाणं त्याने या व्हिडिओसोबत लावलं आहे. अनिश खास असं कॅप्शन देत सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Happy birthday my dragon queen!!! The queen of my heart and the queen of the world!! The special one!! I wish you all the happiness in the world!!! I love you! असं गोड कॅप्शन लिहीत शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओवर सईने हसत Keep your queen वॉर्म अशी कमेंट केली आहे.(Saie Tamhankar Anish Joag )
अनिशनं सईचे खास असे काही फोटो वाढदिवसानिमित्त शेअर केले आहेत. यात सईचा बिनधास्त आणि क्युट असा अंदाज पाहायला मिळतोय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच ती मजा म्हणून रडताना दिसतेय. तर व्हिडिओच्या शेवटी अनिश आणि सईचा स्पेनमधील एकत्र एक फोटोही पाहायला मिळतोय. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे.(Saie Tamhankar Anish Joag )
हे देखील वाचा – १७ व्या वर्षी सोडलं घर, करायचं होत कबड्डीमध्ये करिअर पण… वाचा काय आहे सईची स्ट्रगल स्टोरी
सई आणि अनिश गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी अनिश जोग सोबतच एक फोटो पोस्ट करत तिनं पुन्हा प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. आता सई आणि अनिश दोघे एकत्र स्पेन ला गेले आहेत, ही बातमी ही त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवली. मात्र दोघांनी एक सारखाच फोटो पोस्ट केल्यानं त्याचं हे गुपित सर्वांसमोर उघडकीस आलं.
