‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांकने छोट्या पडद्यावर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली आहे. आजवर शशांक त्याच्या अभिनयाव्यतिरिक्त नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. तो कायम आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. सोशल मीडियावर शशांक प्रचंड सक्रीय असतो. अशातच शशांकने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Shashank Ketkar With Wife)
शशांक केतकरच्या भन्नाट पोस्ट चाहत्यांना नेहमीच आवडतात. कधी एखादा फोटो, तर कधी त्या फोटोला दिलेलं कॅप्शन, अशा त्याच्या बऱ्याच पोस्ट व्हायरल होताना दिसतात. अशातच शशांकने इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये शशांक त्याच्या पत्नीसह खरेदी करायला गेलेला दिसतोय. ही खरेदी करण्यासाठी त्याने कोणताच मॉल वा कोणतंच दुकान निवडलं नसून तो थेट बाजारपेठेत गेला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने त्यावर कॅप्शन देत, “ते मॉलमध्ये शॉपिंग वगैरे ठीक आहे. पण तुळशी बागेत शॉपिंग करणं पूर्णतः वेगळा अनुभव आहे” असं म्हटलं आहे.
शशांकचा तुळशी बागेत शॉपिंगला गेल्याचा व्हिडीओ त्याची पत्नी प्रियांकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. बायकोसह शशांक शॉपिंगसाठी बाहेर पडलेला दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही कमेंट करत व्हिडीओ आवडला असल्याचं सांगितलं आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – ‘झिम्मा २’ चित्रपटाची विक्रमी कमाई, सात दिवसांतच कमावले ‘इतके’ कोटी
शशांक व प्रियांका हे चाहत्यांचे आवडते सेलिब्रिटी कपल आहे. त्यांची केमेस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना आवडली आहे. व्यवसायानं वकील असलेली प्रियांका व शशांक गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतात. प्रियांका व शशांक दोन वर्षांपूर्वी आई-बाबा झाले. नेहमीच ते त्यांचे मजेशीर फोटोस, व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. शशांक सध्या ‘मुरंबा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.





