Nik Jonas Falls : निक जोनास सध्या त्याचा भाऊ केविन जोनास याच्यासोबत युनायटेड स्टेट्स दौरा करण्यात व्यस्त आहे. यावेळी त्याचे लाइव्ह परफॉर्मन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. निक जोनासचे लाईव्ह परफॉर्मन्स चाहत्यांच नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. या दौऱ्यातील काही वेधक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये निक एका कॉन्सर्टदरम्यान गाणं गात असताना स्टेजवर अडखळत खाली पडला असल्याचे दिसले. पडल्यानंतर त्याने स्वतःला सावरत उभं राहत पुन्हा गाणं गायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर निक जोनासच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निक पांढरा शर्ट व पिवळ्या पँटमध्ये पाहायला मिळतोय. गाणं गात गात तो स्टेजच्या काठावर येतो आणि पाय घसरून क्षणार्धात खाली पडतो. बरं पडल्यानंतर निकने स्वतःला सावरत उभं राहत पुन्हा गाणं सुरु केलेलं दिसतंय.
हा व्हिडीओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला असून या व्हिडिओवर चाहत्यांनीही अनेक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी निक जोनासच्या भावनेची प्रशंसा करत हा शो त्याने खराब होऊ दिला नाही त्यामुळे त्याच कौतुक केलं आहे. दरम्यान अनेकांनी निक जोनासची खिल्ली उडवण्यासही सुरुवात केली.
निक जोनास सध्या दोन्ही भावांसोबत टूरवर असून ठिकठिकाणी लाइव्ह कॉन्सर्ट करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घडली तेव्हा निक जोनास त्याच्या भावासोबत न्यूयॉर्कमध्ये परफॉर्म करत होता. निक पडल्याचा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. काही चाहत्यांनी स्टेजच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्टेजच्या मध्यभागी खड्डा कसा आहे, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

या कॉन्सर्टमध्ये निक जोनासची पत्नी प्रियांका चोप्रा आणि तिचे आई-वडीलही उपस्थित होते. प्रियांकाची आई मधू चोप्रा देखील आपल्या जावयाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आल्या होत्या. ही कॉन्सर्ट संपल्यानंतरच्या काही व्हिडिओ क्लिप समोर आल्या आहेत. ज्यामध्ये प्रियांका बॅकस्टेजवर निकला भेटायला जाताना दिसतेय. बॅकस्टेजवर तिने निकला मिठी मारलेली दिसतेय. परफॉर्मन्स संपल्यानंतर निक जोनास प्रियांकाचा हात धरून स्टेडियममधून बाहेर पडला. आणि त्याने हसत हसत हात दाखवत सर्व चाहत्यांचे आभार मानले.