शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एका आजाराशी झुंज…”, अनंत अंबानीला करायचं नव्हतं लग्न, लग्नापूर्वीच मोठा खुलासा, स्वतःच म्हणाला, “तिच्या कुटुंबाने मला…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 1, 2024 | 4:22 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Anant ambani not to marry anyone before meeting radhika merchant see the details

"एका आजाराशी झुंज...", अनंत अंबानीला करायचं नव्हतं लग्न, लग्नापूर्वीच मोठा खुलासा, स्वतःच म्हणाला, "तिच्या कुटुंबाने मला..."

सोशल मीडियासह सध्या सर्व माध्यमांमध्ये मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर बोहल्यावर चढणार आहे. त्यामुळे लग्नाआधी अंबानी कुटुंबाने त्यांच्या गावी जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन आयोजित केले आहेत. या भव्य कार्यक्रमाला बॉलिवूड, हॉलिवूडसह राजकीय, कला, उद्योग व काही सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीही हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या शाही कार्यक्रमाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का, ज्यांच्या लग्नाची एवढी चर्चा सुरु आहे, त्या अनंत अंबानीने एकेकाळी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनंत अंबानीला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अनंत अंबानीने “मी कधीही लग्न करणार नाही, असे मी आधीच ठरवले होते” असं उत्तर दिलं होतं. पण अनंत आंबानीने त्यांच्या उत्तरामागे अतिशय तर्कशुद्ध कारण सांगितले. इतकेच नाही तर भावी पत्नी राधिकासंबंधित काही खास गोष्टीही शेअर केल्या.

View this post on Instagram

A post shared by Nita Mukesh Ambani Cultural Centre (@nmacc.india)

आणखी वाचा – अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमात गाणारी रिहाना नेमकी आहे तरी कोण?, जगभरात रंगली चर्चा, तिची एकूण कमाई आहे तब्बल…

अनंतला त्याच्या लग्नाबद्दल विचारले असता त्याने उत्तर देत असं म्हटलं की, “मी प्राणीप्रेमी आहे. माझ्या लहानपणापासून आजतागायत मी लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या प्राण्यांचीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेवा केली आहे. माझे प्राण्यांवरील प्रेम कधीही संपणार नाही. मला माझा सगळा वेळ या कामात घालवायचा होता. याबरोबबरच त्याला सर्व प्राण्यांची काळजी घ्यायची होती. आपले संपूर्ण आयुष्य प्राण्यांच्या सेवेत घालवायचे होते. माझ्या या कृतीमुळे मला कुणी समजून घेणार नाही, म्हणून मला कधीही लग्न करायचे नव्हते”.

आणखी वाचा – Meraj Zaidi Death : प्रसिद्ध लेखक मेराज जैदी यांचे निधन, वयाच्या ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

यापुढे त्याने भावी पत्नी राधिकाबद्दल त्याचे मत मांडताना असं म्हटलं की, “पण राधिका मर्चंटला भेटल्यानंतर मला ती अगदी माझ्यासारखीच भासली. याशिवाय प्रत्येक अडचणीत राधिका माझ्या  पाठीशी उभी राहिली. जेव्हा मी एका आजाराशी झुंज देत होतो, तेव्हा राधिका आणि तिच्या कुटुंबाने मला पूर्ण साथ दिली. मी माझ्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्यांचा सामना एकट्याने नाही तर राधिकाबरोबर केला आहे. तसेच माझ्या प्राणी प्रेमात तिचीही साथ आहे. तसेच मी प्राण्यांची सेवा करताना राधिका कायम माझ्याबरोबर असते”. 

Tags: anant ambaniAnant Ambani Radhika Merchant MarriageAnant Ambani Radhika Merchant Marriage NewsBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsradhika merchantअनंत अंबानीअनंत अंबानी राधिका मर्चंट लग्नअनंत अंबानी राधिका मर्चंट लग्न बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरजंन बातमीराधिका मर्चंट
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding

हळदीत मित्र-मंडळींना मिठी मारुन रडू लागली पूजा सावंत, उपस्थितांनाही अश्रू अनावर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.