बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंबानी कुटुंबियांच्या लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला दिवसाचे मिळतात तब्बल इतके रुपये, ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 11, 2024 | 3:51 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant's pre-wedding photographer Radhik Joseph know more

अंबानी कुटुंबियांच्या लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला दिवसाचे मिळतात तब्बल इतके रुपये, ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

आयुष्यात लग्न हे एकदाच होतं. त्यामुळे ते लग्न सर्वांच्या आयुष्यभर लक्षात रहावं असं अनेकांना वाटत असतं. त्यामुळे या खास आठवणी तयार करण्यासाठी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले जाते. यासाठी नवरा-नवरीबरोबरच लग्नात एक आणखी महत्त्वाचा माणूस असतो तो म्हणजे फोटोग्राफर. सध्या मात्र काळ एकदमच बदलला असून, लग्न हा एक फोटोग्राफ्री इव्हेंट, तर वेडिंग फोटोग्राफी हे करिअरचे एक क्षेत्र झाले आहे. या क्षेत्रातील देशातील वार्षिक उलाढालीने हजारो कोटी रुपयांची मजल मारली आहे. त्यामुळे अलीकडे लग्नात फोटोग्राफरला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे.

लग्नसोहळा हा आयुष्यातील एक संस्कार असला तरी, फोटोग्राफी हा एक इव्हेंट बनला आहे आणि सध्या अंबानी कुटुंबातील लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत उद्या, शुक्रवार, १२ जुलै रोजी राधिका मर्चंटबरोबर सात फेरे घेणार आहे. या लग्नाआधी अनेक कार्यक्रम झाले असून त्याचे काही खास क्षण आपल्या सर्वांसमोर आले आहेत आणि हे खास सर्वांसमोर आणणारा फोटोग्राफर म्हणजे राधिक जोसेफ.  

View this post on Instagram

A post shared by Joseph Radhik (@josephradhik)

आणखी वाचा – आठ मुलं, चार स्त्रियांबरोबर अफेअर अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांचं वादग्रस्त आयुष्य, आयुष्यभर त्यांचा तिरस्कार केला आणि…

राधिक जोसेफ हे सेलिब्रिटींच्या लग्नात फोटो काढण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी कतरिना कैफ-विकी कौशल, विराट कोहली-अनुष्का शर्मा, सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी, केएल राहुल-अथिया शेट्टी आणि अशा बऱ्याच बड्या सेलिब्रिटींच्या लग्नात फोटोग्राफी केली आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या मुख्य फोटोग्राफीसाठी होते. मात्र फोटोग्राफर होणे हे त्यांचे स्वप्न कधीच नव्हतं.

आणखी वाचा – Video : ‘सुख म्हणजे…’मधील शालीनीचा खऱ्या आयुष्यातील लेक करत आहेत तिची हेअरस्टाइल, व्हिडीओ पाहून कलाकारांकडूनही कौतुक

फोटोग्राफर म्हणून करिअर सुरु करण्यापूर्वी जोसेफ राधिक यांनी सहा वर्षे अभियांत्रिकी आणि त्यानंतर मॅनेजमेंटचा अभ्यास केला. मग त्यांनी गावोगावी टूथपेस्टहे विकली. मग कॉर्पोरेटमध्ये त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. पण मग आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी उच्च पगाराची नोकरी सोडली. २०१०मध्ये त्यांनी नोकरीला रामराम केला आणि ते पूर्णवेळ वेडिंग फोटोग्राफर बनले. अनेक दिग्गज कलाकारांच्या लग्नात फोटो काढण्याचे ते दिवसाचे जवळपास दीड लाख रुपये घेतात.

Tags: Anant Ambani Radhika Merchant Marriage NewsMarathi newsRadhik Joseph Photographer News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Appi Amchi Collector Promo

पुन्हा प्रेमाने संसार थाटण्यासाठी अप्पी विचारणार, पण अर्जुनचा थेट नकार, नात्यात कटूता येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.