शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आठ मुलं, चार स्त्रियांबरोबर अफेअर अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांचं वादग्रस्त आयुष्य, आयुष्यभर त्यांचा तिरस्कार केला आणि…

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 11, 2024 | 1:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actress Rekha's father Gemini Ganesan married four times and he has eight children know more about him

आठ मुलं, चार स्त्रियांबरोबर अफेअर अन्...; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांचं वादग्रस्त आयुष्य, आयुष्यभर त्यांचा तिरस्कार केला आणि...

बॉलिवूड अभिनेत्री रेखा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. रेखाचे आयुष्य हे अगदी संघर्षाने भरलेले आहे. लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या पाहिल्या आहेत. त्यांनी ज्याच्यावर प्रेम केले ती व्यक्त त्यांना सापडली नाही आणि ज्याच्याशी त्यांनी लग्न केले त्या व्यक्तीनी त्यांची साथ सोडली. तसेच ती तिच्या वडिलांचाही तिरस्कार करत होती. रेखाच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन होते. ते एक प्रसिद्ध अभिनेतेही होते. त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही प्रचंड मोठा होता.

रेखा यांचे वडील त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. रेखा यांचे वडील जेमिनी यांनी वयाच्या १९ व्या वर्षी अलामेलूशी पहिले लग्न केले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली. त्यानंतर रेखाची आई पुष्पावलीबरोबर त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यांना रेखा व राधा अशा दोन मुली झाल्या. जेमिनीने रेखाच्या आईशी कधीही लग्न केले नाही. त्यानंतर जेमिनी यांनी त्यांची सहअभिनेत्री सावित्रीशी लग्न केले. यातून त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. जेमिनीचे तिसरे लग्न ज्युलियाना अँड्र्यूशी झाले होते. मात्र तिला कोणी अपत्य नव्हते.

आणखी वाचा – त्रिनयना देवीकडून नेत्राला कुंकवाच्या पाऊलांचे शुभसंकेत, नेत्रा विरोचकाचा सामना करणार का? देवीआईच्या मनात नक्की काय?

रेखाच्या वडिलांना अशी एकूण ८ अपत्ये होती. जेमिनी यांनी रेखाच्या आई पुष्पावलीशी लग्न केले नाही. या कारणामुळे ती तिच्या वडिलांचा तिरस्कार करत होती. मात्र, १९९४ मध्ये रेखा यांनी स्वतः वडिलांना जीवनगौरव पुरस्कार दिला. त्यानंतर वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रेखा यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रेखा यांची लव्हलाईफ अनेकदा चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असताना अनेकदा अनेक अभिनेत्यांबरोबर त्यांचे नाव जोडले गेले आहे.

आणखी वाचा – ‘अशी ही बनवाबनवी’चा दूसरा भाग कधीच येणार नाही, सचिन पिळगावकरांचा खुलासा, म्हणाले, “आता लक्ष्या नाही…”

नवीन निश्चल याच्यानंतर जितेंद्रन किरण कुमार आणि नंतर विनोद मेहरा यांच्याशीही त्यांचे नाव जोडले गेले होते. विनोद मेहराबरोबरच्या त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्याही आल्या होत्या. पण रेखा यांनी नेहमीच या सर्व गोष्टींचे खंडन केले. या कलाकारांबरोबरच अमिताभ बच्चन व रेखा यांच्या नात्याबद्दलच्यादेखील अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि त्या चर्चा आजही रंगताना दिसतात.

Tags: bollywood actressGemini GanesanrekhaRekha father
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Sukh Mhanje Nakki Kaya Asta serial fame Actress Madhavi Nimkar son tying her hair video shared on Instagram

Video : 'सुख म्हणजे…'मधील शालीनीचा खऱ्या आयुष्यातील लेक करत आहेत तिची हेअरस्टाइल, व्हिडीओ पाहून कलाकारांकडूनही कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.