अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. अनेक कलाकार त्यांच्या आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. अनेकांनी एका वेगळ्या पद्धतीचे ड्रेसदेखील परिधान केलेले दिसून येत आहेत. एका मराठमोळ्या जोडीने या सगळ्यामध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही जोडी मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टिमध्ये एक लोकप्रिय जोडी आहे. जिनिलिया नेहमीच अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यामुळेही अधिक ओळखली जाते. तिच्या सौंदर्याची भुरळ आता सगळ्यांनाच पडली आहे. (riteish deshmukh and genelia d’souza look)
अनंत व राधिका यांच्या लग्नात जिनिलिया व रितेश यांची उपस्थिती दिसून येत आहे. याआधीही झालेल्या लग्नाच्या आधी झालेल्या विधीच्या वेळेचे तिचे अनेक लूक समोर आले आहेत. पण आता लग्नाच्या वेळचा लूक पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. यावेळी जिनिलिया फिकट पांढऱ्या व सोनेरी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये दिसून आली आहे. तिची नऊवारी साडी ही वेगळ्या पद्धतीने नेसलेली दिसून येत आहे. तसेच त्यावर साजेशी अशी नाकात नथ व कपाळावर चंद्रकोर लावलेलीही दिसून येत आहे. तिच्या या लूकमुळे ती महाराष्ट्राची सून असल्याचे सिद्ध करत असल्याचेही अनेकांनी म्हंटले आहे.
जिनिलियाबरोबर रितेशचा लूकदेखील चांगलाच चर्चेत आला आहे. रितेशनेदेखील अस्सल मराठमोळा लूक केला आहे. त्याने पांढऱ्या रंगाचे धोतर नेसलेले दिसून येत आहे. तसेच पांढऱ्या रंगाचा त्याचा पूर्ण आऊटफिट दिसून येत आहे. दोघेही एकमेकांबरोबर खूप सुंदर दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांनी त्यावर खूप पसंती दर्शवली आहे. तसेच यावर अनेक प्रतिक्रियादेखील आल्या आहेत.
या साडीबद्दल सांगायचे झाले तर, ही साडी वेगन रिसायकल्ड हिमरू साडी आहे. ही साडी रेशम व सूती धाग्यांपासून बनवली जाते. यावर जरीचे कामदेखील केले जाते. तिच्या या रॉयल अंदाजाने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.