बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर ठरलं! या दिवसापासून सुरु होणार ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सीझन, प्रोमोने वाढवली उत्सुकता, कोणकोणते स्पर्धक दिसणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2024 | 6:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5

अखेर ठरलं! या दिवसापासून सुरु होणार 'बिग बॉस मराठी'चं पाचवं सीझन, प्रोमोने वाढवली उत्सुकता, कोणकोणते स्पर्धक दिसणार?

लोकप्रिय मराठी रिऍलिटी शो ‘बिग बॉस सिझन ५’ची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा ‘बिग बॉस मराठी’चा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या रिऍलिटी शोचे याआधीचे चारही सिझन विशेष गाजले. या चार सिझनच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी लोकप्रिय अभिनेते महेश मांजरेकर यांनी सांभाळली. मात्र आता पाचव्या सिझनची धुरा महेश मांजरेकर नव्हे तर सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे. या पर्वात नेमके कोणते कलाकार झळकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Bigg Boss Marathi Season 5)

नव्या पर्वातील स्पर्धकांसह पाचव्या सिझनची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. यानानंतर काही वेळापूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चा आणखी एक नवा प्रोमो व्हायरल झाला. ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सूट घालून रितेश देशमुख पुणेरी ढोल वाजवताना दिसतो आहे.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेता कोकणातल्या गावी करत आहे भातशेती, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “शेती विकायची नसते तर…”

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

“होणार ढोलताशांचा गजर, सळसळणार उत्साहाची लहर! आज संध्याकाळी जाहीर होणार बिग बॉस मराठीची ‘तारीख’. मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी” लवकरच. “फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर”, असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं होतं. यानंतर आता हा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येणार या प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. हा सिझन आता २८ जुलै या तारखेला रात्री ९ वाजता साऱ्यांच्या भेटीस येणार आहे.

आणखी वाचा – अनंत अंबानीच्या लग्नासाठी मुंबईत आला जॉन सीना, तर किम कार्दशियनही वरातीत दाखल, रिक्षाने प्रवास अन्…

कलर्स मराठीने ‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर करताच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच या प्रोमोवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’मराठीमध्ये नेमके कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5colors marathientertainmentmarathi reality show
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
isha ambani look

भावाच्या लग्नात ईशा अंबानीचा थाटच न्यारा! परिधान केलेल्या लेहंग्यावर गीतेमधील श्लोक, मंदिर, नंदी अन् बरंच काही, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.