अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाह आतापर्यंतचा सर्वात अविस्मरणीय विवाह होता. अजूनही त्यांच्या लग्नसोहळ्याची सांगता झालेली नाही. अशातच सप्टेंबरमध्ये लंडनमध्ये एक कार्यक्रमही होणार आहे, ज्यासाठी मुकेश अंबानी यांनी सेव्हेन स्टार हॉटेल बुक केले आहे. दरम्यान, एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, जो अनंत व राधिका यांच्या हळदी समारंभाचा आहे. या व्हिडीओमध्ये अनंत-राधिका फुलं व हळद लावून हा विधी करताना दिसत आहेत. पण रणवीर सिंग व हार्दिक पांड्याने सगळ्यात जास्त लक्ष वेधलं आहे. (Anant Ambani-Radhika Merchant Wedding)
अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाला अनेक लोक आले होते. पण रणवीर सिंग व हार्दिक पांड्याने लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये ज्या प्रकारे लोकांचे लक्ष वेधून घेतले ते कोणीही विसरु शकत नाही. लग्नाच्या मिरवणुकीत दोघांनीही जोरदार डान्स केला. हळदी दिवशी त्यांचे बरेच लाडही झाले. यादरम्यानचे काही व्हिडीओ समोर आले होते. मात्र त्यात हे जोडपे आणि त्यांचे कुटुंबीय दिसत नव्हते. पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अनंत नीता अंबानींना हळदीने आंघोळ घालताना दिसत आहे तर राधिका तिच्या बहिणीच्या गालावर हळद लावताना दिसत आहे.
त्याचवेळी रणवीर हार्दिकच्या डोक्यावर फुलांनी भरलेली टोपली ठेवताना दिसत आहे. तर यावेळी हळद व फुलांनी आंघोळ करताना रणवीर सिंग दिसला. तर कधी तो ढोलकी वाजवताना दिसत आहे. याशिवाय मुकेश अंबानीही नीता अंबानींवर हळदीने भरलेलं मडकं ओतताना दिसत आहे. तर व्हिडीओमध्ये अनंतने आकाशच्या डोक्याला आणि सासऱ्यांच्या गालावर हळद लावली. तर मुकेश अंबानीने रणवीर सिंगला हळदीने अंघोळ घातली. त्याचवेळी हार्दिक व रणवीर एक वेगळीच मस्ती करताना दिसले. त्याचा डान्स पाहून लोकांनीही बोलण्याची संधी सोडली नाही.
अनंत व राधिकाचा हा हळदीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले की, “ही रणवीर सिंगची हळद आहे का?”. तर एकाने लिहिले, “गुलाब आणि हळदीने होळी खेळा आणि रिचार्जचे पैसे वाढवा”. तर एकाने लिहिले, “अहो, आता झाले. वर्षभर हे असेच चालू राहणार का?”. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले की, “ही रणवीर व हार्दिकची हळद वाटत आहे”. एकाने असेही म्हटले की, “हार्दिक-रणवीर त्यांच्या लग्नात असा आनंद घेऊ शकले नाहीत”. तर एकजण म्हणाला, “सगळा पैशांचा खेळ आहे बाबूभैया”. एकाने लिहिले की, “हार्दिक व रणवीरला डान्ससाठी जास्त पैसे दिले गेले आहेत”, असं म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे.