भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. १२ जुलै रोजी मुंबई येथे दोघांचाही शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच लग्नाआधीच्या सोहळ्याना सुरुवात झाली होती. अनंत व राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी अमेरिकन गायक जस्टीन बीबरने हजेरी लावली होती. त्याने सादर केलेल्या परफॉर्मन्सची चांगलीच चर्चा सुरु झाली होती. (justin bieber performance at ambani wedding)
जस्टीनने अनंत व राधिकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करत कार्यक्रमात रंगत आणली होती. त्याचे परफॉर्म करतानाचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या शोसाठी जस्टीनने सुमारे १० मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ८५ कोटी रुपये रुपयांचे मानधन घेतले आहे. मात्र त्याने घेतलेल्या मानधनावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून त्याला ट्रोल केले जात आहे.
जस्टीनचे परफॉर्म करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली. त्याने परफॉर्म करताना गायलेली गाणी व त्याची दिसत असलेली अंडरवेअर यावर अनेकांनी रंग व्यक्त केला आहे. जस्टीनने परफॉर्म केलेली गाणी कोणालाच आवडली नाहीत तसेच त्याच्या अशा पेहरावासाठी त्याने इतकी मोठी रक्कम वसूल केल्याने मोठ्या प्रमाणात टिका झाली. नेटकरी हा राग अंबानी कुटुंबावर काढत आहेत. या कार्यक्रमांचे आयोजन व वायफळ खर्च करत असल्याने लोक अंबानींना पैसे वाया घालवण्यापेक्षा गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.
या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “भारतीय उद्योगपती हे पैसे देशातील यौन तस्करीचे शिकारी किंवा हजारो मुलांना वाचवण्यासाठी खर्च करु शकतात”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “अंबानी हे खरंतर खूप दयावान आहेत. त्यांच्या रिलायन्स फाउंडेशनने ग्रामीण भागात खूप चांगली कामं केली आहेत”. तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “जिओचा रीचार्ज महाग करुन जस्टीनच्या अंडरवेअरच्या परफॉर्मन्ससाठी कोट्यावधी रुपये देत आणि आणि हे दयावान आहेत”. याबरोबरच अनेकांनी जस्टीनने लिप सिंक करताना दिसत असल्याचेही म्हणत आहेत. परफॉर्म केल्यानंतर तो लगेचच मायदेशी जाण्यासाठी रवाना झाला.