सध्या सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. १२ जुलै २०२४ रोजी दोघांचाही शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. जुलै महिन्याच्या एक तारखेपासून त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या संगीत व हळदी समारंभाचे फोटो व व्हिडीओ समोर आले होते. या समारंभासाठी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. बॉलीवुड मंडळी या सोहळ्यामध्ये पूर्णणे मश्गुल झालेलेदेखील दिसत आहेत. तसकह राधिका व अनंत यांचे लूकदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसून आले आहेत. (orry on vadapav)
लग्नाची तारीख ठरल्यापासून अनंत व राधिका यांचा दोन वेळा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. गुजरात येथील जामनगर येथे जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. या सोहळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. सोशल मीडिया स्टार ओरीदेखील सहभागी झालेला दिसून आला. त्यावेळचा त्याचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
ओरीने इटली येथील पॉर्टोफिनोमध्ये झालेल्या कार्यक्रमातील एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये ओरी फूडस्टॉलवर फिरताना दिसत आहे. त्याच वेळी त्याला एक वडापाव मिळाला. यावेळी त्याच्याबरोबर त्याची जवळची मैत्रीण तानिया श्रॉफदेखील दिसत आहे. ओरी व तानिया एका प्लेटमध्ये वडापाव घेतात. तेव्हा तानिया ओरीला सांगते की, “मला वडापाव खायचा आहे पण त्यामध्ये केस आहे”.
यावेळी ओरी त्या प्लेटवर फोकस करतो आणि त्यात असलेला केस दाखवतो. त्यानंतर ते वडापावचा आस्वाद घेतला. तेव्हा तानिया म्हणते की, “मला एक अजून घास खायचा होता पण त्यामध्ये मला केस सापडला”. ओरीच्या या व्हिडीओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ओरी हिरीरीने भाग घेताना दिसतो. त्याचे अंबानी कुटुंबातील सदस्यांबरोबरचे आणि बॉलीवूडमधील कलाकारांबरोबर धमाल मस्ती करतानाही दिसतो.