मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मालिका बघण्यातच रस नाही”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, कथा पाहून म्हणाले, “फक्त फालतूपणा…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 10, 2024 | 2:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satavya Mulichi Satavi Mulgi serial new twist audience expressed displeasure by making negative comments

"मालिका बघण्यातच रस नाही", 'सातव्या मुलीची...' मालिकेवर भडकले प्रेक्षक, कथा पाहून म्हणाले, "फक्त फालतुपणा..."

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत एकामागोमाग येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका एका उंचीवर पोहोचली आहे. मालिकेच्या कथानकातील एखादे वळण प्रेक्षकांना आवडले तर ते त्यावर आपली पसंती दर्शवतात, पण मालिकेतील एखादा ट्विस्ट आवडला नाही तर त्याबद्दलही प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी मालिकेतील नवीन ट्विस्टवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मालिकेत सध्या नेत्रा गरोदर असून तिच्या पोटात विरोचकाचा अंश वाढत असल्याचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. रुपालीने अद्वैतचे प्रतिबिंब तयार करुन ते नेत्राच्या खोलीत पाठवले होते. मग ते प्रतिबिंब नेत्राच्या पोटावर हात ठेवून मंत्र म्हणतं. याचदरम्यान रुपाली वीणा वाजवून नवीन शक्ती निर्माण करत असते. तितक्यात रुपाली तिच्या खोलीत जाऊन वीणाची तार तोडते. पुढे  नेत्राच्या पोटातील बाळ हे विरोचकाचंच अंश आहे. तिच्या पोटात दैवी असं काही नाही असं विरोचक रुपालीला सांगतो.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : गावी कोकणात पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब, चुलीवर केलं जेवण, साधेपणाने वेधलं लक्ष

याच ट्विस्टबद्दल प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला नाही. त्यामुळे या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा नवीन ट्विस्ट पाहून एका प्रेक्षकाने “आता ही मालिका बघण्यात रस नाही” असं म्हटलं आहे. तर एकाने फालतूपणा सुरु आहे. उगाच गरज नसताना हा ट्विस्ट आणला आहे” असं म्हटलं आहे. तसेच हे विरोचक व नेत्रातील हे युद्ध अघोरी असल्याचेही अनेकांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर ‘पाऊस’ वेबसीरिजची मोठी घोषणा, चित्रीकरणाला सुरुवात, कोणते कलाकार झळकणार?

याबद्दल “अघोरीपणा दाखवून काय मिळतं कुणास ठाऊक. त्यापेक्षा देवाधर्माच्या मालिका सुरु करा, म्हणजे लोक रात्री झोपताना शांत चित्तेने देवाचे नामस्मरण करत तरी झोपतील”, “मालिका सुरू झाली तेव्हा वाटलं ही थर्ड क्लास मालिका बंद करतील. पण तुम्ही तर निर्लज्ज आहात”, “एवढी नकारात्मकता फालतूपणाचा कळस गाठला आहे, हा मूर्खपणा बंद करा” अशा अनेक प्रतिक्रियांमधून प्रेक्षकांनी या नवीन ट्विस्टबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.     

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatavya Mulichi Satavi Mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
orry on vadapav

अनंत अंबानीच्या कार्यक्रमात जेवणाच्या मेन्यूमध्ये असलेल्या वडापावमध्ये होता केस, ओरीनेच दाखवलं सत्य, Inside Video व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.