सध्या सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा आहे. १२ जुलै रोजी दोघंही मुंबई येथे लग्नबंधनात अडकले. त्यानच्या सोहळ्याला जगभरातील अनेक दिग्गज उपस्थित होते. ८ जुलै पासून दोघांच्याही लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. संगीत, हळद तसेच इतर लग्नाआधीचे सोहळे पार पडले. लग्नानंतरही दोन दिवस म्हणजे १३ व १४ जुलै रोजी रिसेप्शनच्या सोहळ्याचे आयोजन केले होते. आता लग्नाच्या पाच दिवसानंतर नवीन जोडपं गुजरात येथे पोहोचले आहे. जामनगर येथे पोहोचताच त्यांचे भव्यदिव्य स्वागतही करण्यात आले. (anant and radhika in jamnagar)
हे वर्ष सुरु होताच मार्च महिन्यातच अनंत व राधिकाच्या लग्नाची धामधूम सुरु झाली होती. गुजरात येथील जामनगरमध्ये दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी हॉलीवूड, बॉलीवूड तसेच इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानादेखील उपस्थित राहिली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा लग्न पार पडल्यानंतर अनंत व राधिका जामनगर येथे दाखल झाले आहेत.
यावेळी दोघंही जामनगर येथे दाखल झाले आहेत. यावेळी दोघांचंही शाही स्वागत करण्यात आलं. नवीन जोडप्यासाठी ढोल, ताशे, सनई व फुलांच्या वर्षावाने त्यांचं जंगी स्वागत केलं. तसेच गाडीमध्ये उभे राहून त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे या व्हीडीओला मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनंत व राधिका यांचे औक्षण होताना दिसून येत आहे. तसेच यावेळी राधिका वाकून सर्वांना नमस्कारही करताना दिसत आहे. अंबानी यांच्या धाकट्या सुनेचा साधा अंदाज सगळ्यांनाच पाहायला मिळाला. यावेळी राधिकाणे गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अनंतने देखील गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप छान दिसत होते.
अनंत व राधिका यांचा १२ जुलै रोजी मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्वेन्शनमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नवीन जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार अनंत व राधिकाच्या लग्नाचे सेलिब्रेशन लंडनमध्ये पार पडणार आहे.