मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“१८ वर्षीय मुलाने कार चालवत धडक दिली”, मराठी अभिनेत्रीचा अपघात; ‘तो’ प्रसंग सांगत म्हणाली, “शुद्ध आली तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 4, 2026 | 4:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Famous Marathi Actress Accident Story

मराठी अभिनेत्रीचा अपघात, 'तो' प्रसंग सांगत म्हणाली

Famous Marathi Actress Accident Story : मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री राजश्री निकम यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाचा अनुभव शेअर केला आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘लाडाची मी लेक गं’, ‘मोलकरीण बाई’, ‘एक घर मंतरलेलं’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. राजश्री निकम यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी त्यांनी अनुभवलेला संघर्ष आणि त्याच काळात झालेला गंभीर अपघात याबाबत त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

‘FM KMW 29’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राजश्री यांनी सांगितलं की, नाटकासाठी नोकरी सोडल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांचा भीषण अपघात झाला होता. “मला एका कारने जोरात धडक दिली होती. गाडी चालवणारी मुलं १८ वर्षांखालील होती. अपघातानंतर मी पूर्णपणे बेशुद्ध झाले होते आणि थेट रुग्णालयात शुद्धीवर आले,” असं त्यांनी सांगितलं. या कठीण प्रसंगात दिग्दर्शक वामन केंद्रे, विनय येडेकर, सुधीर जोशी आणि पुष्कर श्रोत्री यांनी माझी खूप काळजी घेतली. असं त्यांनी सांगितलं. मात्र अपघातानंतर जवळपास वर्षभर मला कोणतंच काम मिळालं नाही. मी करत असलेलं नाटकही त्या काळात बंद पडलं होतं,” असं त्या म्हणाल्या.

आणखी वाचा – “पैसे थकवल्यावर कलाकार आवाज उठवू शकतो” मंदार देवस्थळी वादावर ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्रीचं स्पष्ट भाष्य

View this post on Instagram

A post shared by Rajashri Nikam (@rajashri.nikam)

पुढे राजश्री यांनी अभिनयाच्या सुरुवातीच्या संघर्षाचीही आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की, “मी नाटक करत असतानाच नोकरीही करत होते. नाटकांच्या दौऱ्यांसाठी अनेकदा सुट्टी घ्यावी लागायची. मात्र एकदा माझ्या वरिष्ठांनी माझ्या नाटकाची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिली होती. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की, नोकरी आणि नाटक यापैकी एक निवडावं लागेल.” त्या काळात आर्थिक परिस्थितीही कठीण असल्याचं सांगत राजश्री पुढे म्हणाल्या, “नाटकातून मिळणारं मानधन खूप कमी होतं, तर नोकरीतून चांगला पगार मिळत होता. तरीसुद्धा मी नाटकाचाच मार्ग निवडला. तेव्हा माझ्या वरिष्ठांनी फोनवरूनच मला ‘तू खूप मोठी होशील’ असं सांगितलं होतं. त्यानंतरचा काळ संघर्षाचा होता, पण अखेर मला ‘दामिनी’ ही पहिली मालिका मिळाली.” असं म्हणत राजश्री निकमने त्यांच्या वाईट काळाबद्दल सांगितले.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली, दोघांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो केले शेअर, म्हणाली, “जोश्यांची सून…”

Tags: Famous Marathi Actress Accident Storymarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Shamita Shetty dating news

Photo : राकेश बापटबरोबर ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात?, 'त्या' फोटोंनी चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.