सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Photo : राकेश बापटबरोबर ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात?, ‘त्या’ फोटोंनी चर्चांना उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 5, 2026 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shamita Shetty dating news

Photo : राकेश बापटबरोबर ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात?, 'त्या' फोटोंनी चर्चांना उधाण

Shamita Shetty dating news : अभिनेत्री शमिता शेट्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. नुकताच अभिनेत्रीने तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यादरम्यान, तिचे टेक्नो आर्टिस्ट दीपेश शर्मासोबतचे फोटोही व्हायरल होत आहेत. शमिताच्या दीपेशसोबतच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शमिता शेट्टी लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. दीपेशने शमितासोबतच्या बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते एकत्र पोज देताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत शिल्पा शेट्टीही होती.

फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझी मैत्रीण जी मला नेहमी हसवते. जिला माझ्या सर्व कथा माहित आहेत आणि तरीही माझ्याबरोबर ती कायम आहे. लव्ह यू मेरी शमस्टर”. यावर कमेंट करताना शमिताने लिहिले, “ओव”. आणि यासह तिने रेड हार्ट इमोजी देखील जोडला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या. मात्र, याबाबत शमिता किंवा दीपेशकडून अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली, दोघांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो केले शेअर, म्हणाली, “जोश्यांची सून…”

View this post on Instagram

A post shared by Deepesh Sharma (@deepeshsofficial)

शमिताचे अभिनेता राकेश बापटसोबत अफेअर होते. राकेश आणि शमिता यांची भेट ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये झाली होती. पण हे नाते फार काळ टिकले नाही. २०२२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर तिचे नाव आमिर अलीसोबतही जोडले गेले. आमिर आणि शमिताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आमिर पार्टीबाहेर शमिताला किस करताना दिसत होता. मात्र शमिता आणि आमिरने हे दोघे फक्त मित्र असल्याचे स्पष्ट केले.

आणखी वाचा – “१८ वर्षीय मुलाने कार चालवत धडक दिली”, मराठी अभिनेत्रीचा अपघात; ‘तो’ प्रसंग सांगत म्हणाली, “शुद्ध आली तेव्हा…”

शमिताने ‘मोहब्बतें’, ‘द टॅलेंट’, ‘फरेब’, ‘कॅश’, ‘मेरे यार की शादी है’, ‘जहर’, ‘बेवफा’, ‘अग्निपंख’ यांसारखे चित्रपट केले आहेत. शमिताला फिल्मी दुनियेत जे यश मिळालं ते तिची बहीण शिल्पा शेट्टीला मिळालं नाही. शमिता शेट्टी ४७ वर्षांची असून तिचे अद्याप लग्न झालेले नाही.

Tags: entertainmentraqesh bapatShamita Shetty
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bollywood singing industry issues

"उदरनिर्वाह होईल एवढेही पैसे मिळत नाहीत", मराठमोळ्या गायकाचा मिळणाऱ्या मानधनाबाबत खुलासा, म्हणाला, "आमचं शोषण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.