‘लस्ट स्टोरीज’चा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या होत्या. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या.त्यामुळे दुसरा भाग कधी येणार याबद्दल प्रेक्षक उत्सुक होता. आणि पाच वर्षा नंतर आता ‘लस्ट स्टोरीज’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.(Amruta Subhash Intimate Scene)
या दुसऱ्या भागात देखील चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या चार कथा यात पाहायला मिळतात.यातलं एका कथेचं दिग्दर्शन कोंकना सेन शर्माने केलं आहे. आणि त्या कथेत प्रेक्षकांची आवडती मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष झळकली आहे. या पूर्वीही अमृताने हिंदी भाषेत बरच काम केलं आहे. गली बॉय या चित्रपटातून तसेच लोकप्रिय वेब्सिरीज सेक्रेड गेम्स मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लस्ट स्टोरीज २ या चित्रपटा निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अमृताला इंटिमेट सीन शूट करताना दिग्दर्शक आणि दिग्दर्शिकेचा दृष्टीकोन वेगळा असतो का, असा प्रश्न विचारण्यात आला होता? कारण सेक्रेड गेम्सच्या वेळेस अमृताने दिग्दर्शक अनुराग कश्यप तर लस्ट स्टोरीज २ च्या वेळेस तिने दिग्दर्शिका कोंकना सेन शर्मा सोबत काम केलं.

पाहा काय म्हणाली अमृता? (Amruta Subhash Intimate Scene)
त्यावर उत्तर देताना अमृताने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबतचा एक किस्सा सांगितला. अमृताचा पहिला इंटिमेट सीन अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. या शूटिंगविषयी तो अत्यंत संवेदनशील असल्याचं तिने सांगितलं.सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगदरम्यान अनुरागने त्याच्या डायरेक्शन टीमला बोलावलं होतं आणि त्यांनी अमृताशी आधी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी अनुरागने अमृताच्या मासिक पाळीच्या तारखेनुसार शूटिंग शेड्युल ठरवण्याच्या सूचना टीमला दिल्या होत्या. जेणेकरून इंटिमेट सीन शूट करताना अमृता कम्फर्टेबल राहू शकेल. याविषयी ती म्हणाली, “मी माझा पहिला सेक्स सीन अनुरागसोबत ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये केला होता. तिथे पुरुष किंवा महिला दिग्दर्शकाचा प्रश्नच नव्हता. कारण तो खूप संवेदनशील होता. त्याने त्याच्या टीमला बोलावलं होतं. माझ्या मासिक पाळीची तारीख त्याने विचारली जेणेकरून त्यादरम्यान शूटिंग शेड्युल ठेवता येणार नाही.”(Amruta Subhash Intimate Scene)

हे देखील वाचा: ‘..म्हणून अमृता सुभाषने नावापुढे आडनांव लावायचं सोडून दिलं’
‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये अमृताने रॉ एजेंटची भूमिका साकारली होती.अमृता कायमच वैविध्यपूर्ण भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. तिची अभिनयाची जाण, सहजता,बिनधास्तपणा या पैलूंमुळे ती कायमच प्रेक्षकांचं मन जिंकत आली आहे.
