शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला पण तिने…”, सई ताम्हणकरबाबत स्पष्टच बोलली अमृता खानविलकर, म्हणाली, “तिच्याकडून मला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 30, 2023 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amruta khanvilkar sai tamhankar

“तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला पण तिने...”, सई ताम्हणकरबाबत स्पष्टच बोलली अमृता खानविलकर, म्हणाली, “तिच्याकडून मला...”

मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. अमृताच्या नृत्यकौशल्यावर लाखो प्रेक्षक फिदा आहेत. पण त्याचबरोबरीने तिने रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अमृताने आजवर कलाक्षेत्रात काम करत असताना काही कलाकारांशी घट्ट मैत्री केली. पण सई ताम्हणकर आणि तिचं कधीच जमलं नाही. याबाबत तिने आता भाष्य केलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अमृता हजेरी लावणार आहे. या भागाचे काही प्रोमो समोर आले आहेत. या कार्यक्रमात ती प्रत्येक प्रश्नांची बेधडक उत्तरं देताना दिसेल. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते अमृताला सईचा फोटो दाखवतो. हा फोटो पाहिल्यानंतर अमृता तिच्याबाबत व्यक्त होताना दिसते. तसेच दोघींमध्ये मैत्री का होऊ शकली नाही? हे ती सांगत आहे.

आणखी वाचा – रवींद्र महाजनींच्या मृत्यूमागचं खरं कारण काय?, गश्मीर महाजनीने सांगितलं सत्य, म्हणाला, “त्यांचा मृत्यू…”

अमृता म्हणाली, “मुळात म्हणजे मला ती अभिनेत्री म्हणून खूप आवडते. असं अनेकदा झालं आहे की, मी तिची मैत्रीण होण्याचा खूप प्रयत्न केला आहे. पण तिच्याकडून मला तो प्रतिसाद मिळाला नाही”. यावर “भांडण वगैरे काही झालं होतं का?” असं अवधूत अमृताला विचारतो. यावेळी अमृता म्हणते, “नाही नाही अगदीच नाही. आपण एका इंडस्ट्रीमध्ये आहोत म्हणून नेहमीच एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतो असं नाही”.

आणखी वाचा – “दोघांचा प्रेमविवाह होता पण…”, आई-वडिलांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला, “दुर्देवाने फक्त तिनेच…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अमृताने सईबरोबर असलेल्या नात्याबाबत पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. सई व अमृतामध्ये कोणत्याच प्रकारचं भांडण झालं नाही. पण दोघींमध्ये कधीच मैत्री झाली नाही. पण सुरुवातीच्या काळामध्ये अमृता व सई एकमेकींच्या मैत्रीण होत्या असं बोललं जातं. आजही एखाद्या कार्यक्रमात दोघीही भेटल्या की त्यांचं बोलणं होतं. मात्र मैत्रीसारखं घट्ट नातं दोघींमध्ये कधीच पाहायला मिळालं नाही.

Tags: amruta deshmukhentertainment newsmarathi actresssai tamhankar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Gashmeer mahajani talk about her father Ravindra mahajani

“डोक्यावर कर्ज असताना ते घर सोडून गेले अन्...”, गश्मीर महाजनीने सांगितलं वडिलांबाबतचं सत्य, म्हणाला, “बँकेच्या हातापाया पडावं लागलं कारण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.