मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ मराठीमुळे प्रसाद व अमृता ही जोडी चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि त्याच रुपांतर प्रेमात झालं. लग्नाआधी त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या मात्र त्यावर त्यांनी कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही. त्यानंतर प्रसाद व अमृता यांनी थेट त्यांचा साखरपुड्याचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. (Amruta deshmukh And Prasad Jawade)
प्रसाद व अमृता यांनी अगदी शाही थाटामाटात लग्नसोहळा उरकला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ चर्चेत राहिले. लग्नानंतर ही जोडी लगेचच कामाला लागली. अमृता रंगभूमीकडे वळली, तर प्रसाद मालिकाविश्वात रमलेला दिसला. सध्या प्रसाद झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तो आदित्य किर्लोस्कर ही भूमिका साकारत आहे. अल्पावधीतच ही मालिका आणि मालिकेतील प्रसादची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

‘पारू’ मालिकेच्या शुटिंगनिमित्त प्रसाद सध्या साताऱ्यात आहे. या मालिकेचं चित्रीकरण सातारा येथे सुरु आहे. त्यामुळे प्रसादला घरापासून दूर राहून शूटिंग करावं लागतं. सध्या प्रसाद त्याच्या बायकोसह साताऱ्यात आहे. प्रसाद अमृताला त्याच्या मालिकेच्या सेटवर घेऊन गेला आहे. अमृताने “आजची डेट आदित्य किर्लोस्करबरोबर” असं कॅप्शन देत तिने किर्लोस्कर मेन्शनमधील प्रसादबरोबरचा फोटो शेअर केला आहे. तसेच प्रसाद अमृताला त्याच्या शूटिंग लोकेशनची ओळख करुन देतानाचा व्हिडीओही तिने शेअर केला आहे.
सध्या अमृता प्रसादबरोबर साताऱ्यात असून दोघेही एकमेकांना वेळ देत आहेत. नुकत्याच इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसादने शूटिंग साताऱ्यात असल्याने त्याला कुटुंबाला, बायकोला वेळ देता येत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. यावेळी बोलताना तो म्हणाला, “आम्ही सातारा येथे शूट करत आहोत. कधी कधी घराची खूप आठवण येते. माझं नुकतंच लग्न झालं आहे, त्यामुळे बायकोला सोडून राहावं लागतं तो एक मोठा टास्क आहे. अधूनमधून आम्ही एकमेकांना भेटतो. कधी ती साताऱ्यात तर कधी मी मुंबईत असं भेटणं सुरुच असतं”.