अमृता देशमुख व प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी आहे. ‘बिग बॉस मराठी’मुळे ही जोडी एकत्र आलेली पाहायला मिळाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीपूर्व नातं होतं. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. थेट साखरपुडा करत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबरमध्ये एकमेकांशी लग्न केले. प्रसाद-अमृताचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. आता लग्नानंतर प्रसाद व अमृता दोघेही कामाला लागले आहेत. प्रसाद सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पारु’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तर अमृता ही तिच्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. (prasad jawade and amruta deshmukh video)
मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त प्रसाद सध्या घरापासून दूर सातारा येथे राहत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी हे त्यांच्या शूटिंगनिमित्त बरेचदा घरापासून दूर असतात. कामानिमित्त त्यांना घरापासून दूर राहून शूटिंग करावं लागत. मात्र अनेकदा ही मंडळी वेळ काढत आपल्या प्रियजनांना भेटतात. त्याप्रमाणे अमृता व प्रसादही वेळात वेळ काढत एकमेकांना भेटत असतात. अमृता साताराला जात त्याला सरप्राइजही देत असते.

अशातच नुकत्याच ‘झी मराठी’ वाहिनीच्या नॉमिनेशन पार्टीला प्रसादने हजेरी लावली होती. सर्व ‘झी मराठी’चे कलाकार या पार्टीला हजर होते. यावेळी प्रसादही इतर कलाकारांसह थिरकताना दिसला. यावेळी अमृतानेही या पार्टीला सरप्राइज हजेरी लावली. प्रसाद नेमकं काय करतो हे रंगेहात पकडण्यासाठी ती या पार्टीत पोहोचली असल्याचं तिने गमतीत म्हटलं आहे. अभिनेत्रीने या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – “मागून कधीच मान मिळवला नाही”, जान्हवीने केलेल्या अपमानावर पॅडी यांचं भाष्य, म्हणाले, “अजूनही माफी नाहीच”
“जेव्हा तुम्हाला त्याला रंगेहात पकडायचं असतं, पण तो सर्वांत वेगळा आहे”, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अमृताला पाहून प्रसाद त्याचवेळी धावत नाचत नाचत तिच्याकडे आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अमृता व प्रसाद नेहमीच एकमेकांची पोलखोल करत व्हिडीओ शेअर करत असतात.