‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अमोलला काही करून त्याच्या आई-बाबांना एकत्र आणायचं असतं. अमोल ला त्याच्या माँ-बाबांनी कायम तुझ्याबरोबर असू अशा शब्द दिलेला असतो मात्र एकमेकांबरोबर असू असं ते बोललेले नसतात. त्यामुळे अमोलला खूप मोठं टेन्शन येतं. त्यावेळी अमोल हे सगळं काही दीपेशला सांगतो. तेव्हा दीपेश सांगतो की, आता आपल्याला काहीतरी आयडिया यायला हवी त्याच वेळेला तिथे मोना येते आणि मोना दीपेशला सांगते की, आपण कुठेतरी रात्री डेटला जाऊया का?, मलाही घरातली काम करुन फार कंटाळा आलेला आहे. (Appi Amchi Collector Serial Update)
हे ऐकताच अमोलला आयडिया सुचते की आपण जर माँ-बाबाची डेट करुन आणली तर किती चांगलं होईल ना?, हे ऐकल्यावर मोनाला तर रागच येतो. तर दीपेश मात्र अमोलच्या जोडीला तयारीला लागतो. घरातचं ते डेट प्लॅन करतात. या वेळेला त्याचे दोन्ही आजोबाही यात सहभागी होतात. अमोलच्या आनंदाशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो म्हणून तेसुद्धा यात सहभागी होतात आणि जेवणाचे डिपार्टमेंट स्वतःकडे घेतात. तर दीपेश संपूर्ण तयारी करायचे डिपार्टमेंट घेतो. अमोलचे मित्रही त्याला मदत करत असतात. सगळी तयारी होत असताना अमोल सगळ्यांवर लक्ष ठेवतो.
तर इकडे मोना रूपालीला फोन करुन अप्पी व अर्जुनच्या डेटबद्दल सांगते. त्याच वेळेला तिथे आर्यासुद्धा असते. आर्याच्या लक्षात येतं की, रूपाली वहिनींना इथं थांबून काही फायदा नाही त्या तिकडे गेल्या तर काहीतरी नक्कीच होईल, असा विचार ती करते. तर रूपालीही विचार करु लागते. अप्पी व अर्जुन जेव्हा घरी येतात तेव्हा अमोल त्यांना सरप्राईज देतो आणि सांगतो की, आम्ही तुमच्यासाठी डेट प्लॅन केला आहे आणि आम्ही तुमचं सगळं आवडीचं केलं आहे. तुम्ही सांगाल ती ऑर्डर आज आम्ही फॉलो करणार आहोत.
अमोलने केलेली तयारी पाहून अर्जुन व अप्पीला खू मोठा धक्का बसतो आणि ते एकमेकांकडे बघू लागतात. आता अप्पी व अर्जुनची रोमँटिक डेट यशस्वी होईल का?, की रूपाली अप्पीच्या घरी येऊन काही तमाशा करेल हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.