शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुन-अप्पी एकत्र येण्यासाठी अमोलचा नवा डाव, प्लॅन केली रोमँटिक डेट, दोघांना खूप मोठा धक्का बसला आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 9, 2024 | 10:47 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Appi Amchi Collector Serial Update

अर्जुन-अप्पी एकत्र येण्यासाठी अमोलचा नवा डाव, प्लॅन केली रोमँटिक डेट, दोघांना खूप मोठा धक्का बसला आणि…

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अमोलला काही करून त्याच्या आई-बाबांना एकत्र आणायचं असतं. अमोल ला त्याच्या माँ-बाबांनी कायम तुझ्याबरोबर असू अशा शब्द दिलेला असतो मात्र एकमेकांबरोबर असू असं ते बोललेले नसतात. त्यामुळे अमोलला खूप मोठं टेन्शन येतं. त्यावेळी अमोल हे सगळं काही दीपेशला सांगतो. तेव्हा दीपेश सांगतो की, आता आपल्याला काहीतरी आयडिया यायला हवी त्याच वेळेला तिथे मोना येते आणि मोना दीपेशला सांगते की, आपण कुठेतरी रात्री डेटला जाऊया का?, मलाही घरातली काम करुन फार कंटाळा आलेला आहे. (Appi Amchi Collector Serial Update)

हे ऐकताच अमोलला आयडिया सुचते की आपण जर माँ-बाबाची डेट करुन आणली तर किती चांगलं होईल ना?, हे ऐकल्यावर मोनाला तर रागच येतो. तर दीपेश मात्र अमोलच्या जोडीला तयारीला लागतो. घरातचं ते डेट प्लॅन करतात. या वेळेला त्याचे दोन्ही आजोबाही यात सहभागी होतात. अमोलच्या आनंदाशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो म्हणून तेसुद्धा यात सहभागी होतात आणि जेवणाचे डिपार्टमेंट स्वतःकडे घेतात. तर दीपेश संपूर्ण तयारी करायचे डिपार्टमेंट घेतो. अमोलचे मित्रही त्याला मदत करत असतात. सगळी तयारी होत असताना अमोल सगळ्यांवर लक्ष ठेवतो.

आणखी वाचा – आदित्य-अहिल्यादेवींना एकत्र आणण्यासाठी पारूचा नवा प्लॅन, दामिनीची नवी चाल यांत अडथळा आणणार का?

तर इकडे मोना रूपालीला फोन करुन अप्पी व अर्जुनच्या डेटबद्दल सांगते. त्याच वेळेला तिथे आर्यासुद्धा असते. आर्याच्या लक्षात येतं की, रूपाली वहिनींना इथं थांबून काही फायदा नाही त्या तिकडे गेल्या तर काहीतरी नक्कीच होईल, असा विचार ती करते. तर रूपालीही विचार करु लागते. अप्पी व अर्जुन जेव्हा घरी येतात तेव्हा अमोल त्यांना सरप्राईज देतो आणि सांगतो की, आम्ही तुमच्यासाठी डेट प्लॅन केला आहे आणि आम्ही तुमचं सगळं आवडीचं केलं आहे. तुम्ही सांगाल ती ऑर्डर आज आम्ही फॉलो करणार आहोत.

आणखी वाचा – “तुमच्या अ’चुक’ अंदाजामुळे…”, वेधशाळेच्या पावसावरील अंदाजाबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट, म्हणाली, “लोक बाहेर पडली नाहीत आणि…”

अमोलने केलेली तयारी पाहून अर्जुन व अप्पीला खू मोठा धक्का बसतो आणि ते एकमेकांकडे बघू लागतात. आता अप्पी व अर्जुनची रोमँटिक डेट यशस्वी होईल का?, की रूपाली अप्पीच्या घरी येऊन काही तमाशा करेल हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

Tags: Appi Amchi CollectorAppi Amchi Collector Serial Updatemarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Singer Armaan Malik Statement

"माझा काही संबंध नाही", 'बिग बॉस…' स्पर्धकामुळे गायक अरमान मलिकच्या नावाचा गोंधळ, म्हणाला, "माझी प्रतिष्ठा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.