रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमच्या अ’चूक’ अंदाजामुळे…”, वेधशाळेच्या पावसावरील अंदाजाबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट, म्हणाली, “लोक बाहेर पडली नाहीत आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 9, 2024 | 10:18 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Hemangi Kavi shared a sarcastaic post about the weather forecast of rain

"तुमच्या अ'चूक' अंदाजामुळे...", वेधशाळेच्या पावसावरील अंदाजाबद्दल सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट, म्हणाली, "लोक बाहेर पडली नाहीत आणि..."

मुंबई आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या सहा तासांमध्ये मुंबईत ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुंबईत सोमवारी भल्या पहाटेपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईची अक्षरश: तारांबळ झाली. अनेक चाकरमन्यांचे यामुळे हाल झाले. मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा मुंबईकरांना मोठा सामना करावा लागला. त्यामुळे शासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टीदेखील जाहीर केली.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई-ठाणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. संततधार पडणाऱ्या पावसामुळे हवामान खात्यानेही सावधानतेचा ईशारा दिला होता. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज शाळा व  महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कालच्या पावसाचा फटका हा सामान्य नागरीकांसह नेते व अभिनेते यांनाही बसला. अशातच आजच्या पावसाच्या परिस्थितीवर अभिनेत्री हेमांगी कवीने व्यंग्यात्मक पोस्ट शेअर केली आहे. कालच्या पावसाच्या अंदाजावरुन वेधशाळेने आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र त्यानुसार आज पाऊस पडत नसल्याबद्दल हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे खोचक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – चंदीगढमध्ये घर, १० फ्लॅट, महागड्या कार अन्…; अरमान मलिककडे आहे इतकी संपत्ती, ऑडीमध्ये बसून शाळेत जातो लेक

हेमांगीने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “धन्यवाद वेधशाळा, तुमच्या अ‘चूक’ अंदाजामुळे शाळा, कॉलेजला सुट्ट्या, लोक बाहेर पडलेली नाहीत आणि बाहेर लख्ख ऊन पडलं आहे. त्यामुळे मी सुसाट शूटिंगला पोहोचत आहे”.

आणखी वाचा – ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, टीव्ही पाहताना हृदयविकाराचा तीव्र झटका

हेमांगी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते, सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर ती अनेकदा राजकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करतानादेखील दिसते. अशातच तिने वेधशाळेच्या पावसाबद्दलच्या अंदाजाबद्दल व्यंगात्मक पोस्ट शेअर केली आहे.       

Tags: hemangi kavimarathi actressmumbai rainWeather Forecast
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Paaru Serial Update

आदित्य-अहिल्यादेवींना एकत्र आणण्यासाठी पारूचा नवा प्लॅन, दामिनीची नवी चाल यांत अडथळा आणणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.