ऐतिहासिक चित्रपट वा मालिका म्हटलं की आधी नाव सुचत ते म्हणजे अभिनेते अमोल कोल्हे यांचं. ऐतिहासिक भूमिका अगदी चोख आणि तंतोतंत निभावणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अमोल कोल्हे. बऱ्याच ऐतिहासिक चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवत अमोल कोल्हे यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अमोल कोल्हे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. ते अधूनमधून काही ना काही पोस्ट आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.(amol kolhe challenge)

इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सूर्यनमस्कार करताना दिसत आहेत. त्यावेळी ते म्हणतायत की, ‘अनेक दिवसांचं स्वप्न होत १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचं आणि हे चॅलेंज स्वतःशी होत. आज फायनली पूर्ण झालं आणि वाटतंय ते simply wow. जय शिवराय.’ असे म्हणत अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. फिटनेसकडे अमोल कोल्हे नेहमीच विशेष लक्ष देत असतात. त्यांनी स्वतःलाच दिलेलं हे चॅलेंज पूर्ण करत हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट पाहून त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत भरभरून प्रतिसाद दिला आहे.
पहा अमोल कोल्हेंच नवं चॅलेंज (amol kolhe challenge)
अभिनयाची छाप पाडणारे अमोल कोल्हे ऐतिहासिक भूमिकेतुन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो अथवा संभाजी महाराज असोत्यांच्या प्रत्येक भूमिकेतून
प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनय राजकारणाच्या बरोबरीने ते निर्मिती क्षेत्रात ही बऱ्यापैकी सक्रीय आहेत. मालिकेच्या निर्मितीबरोबरच ‘शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोगदेखील महाराष्ट्रात सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी या महानाट्याचा प्रयोग नाशिक, औरंगाबाद येथे पार पडला.(amol kolhe challenge)
हे देखील वाचा – अनिरुद्धला मिळालं अरुंधतीसोबत वाद घालण्यासाठी नवं कारण
खासदार आणि अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे यांनी छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिका साकारून प्रेक्षकांसमोर त्यांना यशस्वीपणे उभे केले. शिवरायांचा इतिहास त्यांनी घराघरात पोहोचवलाय.
