Amitabh Bachchan And Abhishek Bachchan : अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय वडील-मुलाची जोडी आहे. आणि प्रेक्षकांनाही त्यांचे हे नाते आवडते. ‘कौन बनेगा करोडपती १६’ च्या आगामी एपिसोडमध्ये अभिषेक हॉट सीटवर बसून बिग बींचा पाय ओढताना दिसणार आहे. सोनी टीव्हीच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये अभिषेकने त्याच्या वडिलांची तक्रार केली आहे. अभिषेकला आजोबांचे एक वाक्य आठवले तेव्हा या विनोदाला सुरुवात झाली. हा किस्सा त्याने या ‘केबीसी’च्या मंचावर सांगितला. तो म्हणाला, “आजोबांनी तुम्हाला सांगितले होते की, ‘ज्या दिवशी तुझा मुलगा तुझे बुट घालेल, त्या दिवशी तो तुझा मुलगा नसून तो तूच असशील’.
या वाक्यावर अभिषेक बच्चनने असं म्हटलं की, “मला किती अभिमान वाटतो की, मी आपल्या वडिलांचे बूट घालू शकतो”. पण या वक्तव्याला फिरवत गमतीने त्याने अमिताभला विचारले, “आपले वडील ज्या दिवशी आपल्या हुडीज, जीन्स, मोजे, टी-शर्ट घालू लागतील, तेव्हा ते कोण होतील?”. अभिषेकच्या या प्रश्नानंतर अमिताभ काहीसे लाजताना दिसले.
आणखी वाचा – ‘Bigg Boss…’ फेम डीपीने घेतली नवीन कार, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, म्हणाला, “फक्त वडिलांना…”
त्यानंतर अभिषेकने कपडे उधार घेण्यावरुन वडिलांची छेड काढली. शोदरम्यान अमिताभने अभिषेकचे शूज घातले होते, याचाही अभिषेकने खुलासा केला. यावर बिग बींनीही अभिषेकची खिल्ली उडवली. बिग बी अभिषेकला म्हणाले, “भावा, या छोट्या मोठ्या गोष्टी तरी आता मागू नका”. सोनी टीव्हीने क्लिपला कॅप्शन दिले आहे, “ते खरोखर वडील-मुलासारखे आहेत”. हा एपिसोड २२ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्रसारित होईल
अभिषेक बच्चन ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये त्याच्या आगामी ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसणार आहे. शुजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेकबरोबर जॉनी लीव्हर आणि अहिल्या बमरू यांच्या भूमिका आहेत. ‘आय वॉन्ट टू टॉक’ २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. आता या चित्रपटात अभिषेक कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे सार पाहणं रंजक ठरणार आहे.