शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

८०व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या का दिसत नाहीत? स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “त्यासाठी मी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2023 | 7:00 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Amitabh Bachchan Reveals His Secret

Amitabh Bachchan Reveals His Secret

बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. त्यांनी बॉलीवूडला अनेक दर्जेदार चित्रपट दिले. ‘जंजीर’, ‘शोले’, ‘आनंद’, ‘त्रिशूल’, ‘मुक्कदर का सिकंदर’ अशा सुपरहिट चित्रपटांमधून ते सगळ्यांचे ‘अ‍ॅग्री यंग मॅन’ झाले. त्यांनी स्वतःची मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील जागा निर्माण केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे मागील १४ वर्षांपासून ते सूत्रसंचालन करत आहेत. आता या कार्यक्रमाच्या १५व्या सीजनची जोरदार सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना त्यांच्यासमोर येऊन बसण्याची संधी मिळतं आहे. त्यामुळे स्पर्धक व अमिताभ यांच्यातील संवाद बराच खुलताना दिसत आहे. हॉटसीटवर बसवून अमिताभ सुद्धा स्पर्धकांसोबत मज्जामस्ती करताना दिसतात. अशात एका स्पर्धकाने अमिताभ यांना त्यांच्या दाढीवरून प्रश्न केला त्यावर त्यांनी खुलासा करत उत्तर दिलं आहे.(Amitabh Bachchan Reveals His Secret)

‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाची १६ ऑगस्टला सुरूवात झाली. पहिल्याच एपिसोडला एका स्पर्धकाने अमिताभ यांना प्रश्न विचारत हॉटसीटवर बसवलेलं पहायला मिळालं. त्याने अमिताभ यांच्या दाढीच्या रहस्याबद्दल प्रश्न विचारला, “तुम्ही दाढी कशी मेंटेन ठेवता.” या प्रश्नावर रहस्य उलघडत अमिताभ यांनी सांगितलं, “मी दाढी मेंटेन ठेवत नाही तर दाढी स्वतःच नीट राहते.” असं सांगत पुढे त्यांनी ‘अक्स’ चित्रपटाचा किस्सा सांगितला.

वाचा – का अमिताभ ठेवतात दाढी? (Amitabh Bachchan Reveals His Secret)

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

आणखी वाचा – ‘OMG २’नंतर अक्षय कुमारच्या आणखी एका बड्या चित्रपटाची घोषणा, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का?

अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “’अक्स’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान मला अशीच दाढी ठेवावी लागली होती. पण मी स्वतःला जेव्हा आरशात पाहिलं तेव्हा मला ही स्टाईल आवडली. तेव्हापासून मी अशी स्टाईल ठेवायला लागलो. जसजसं वय वाढत जातं तसतसं डबल चीन व सुरकुत्या देखील वाढतात. ते लपवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. हे पण एक कारण आहे की मी अशी दाढी ठेवतो आणि नेहमी ट्रिम करतो.”

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या नारकर शिक्षणात अव्वल, स्वतःच सांगितलं किती झालं आहे शिक्षण?

अमिताभचे बरेच चाहते आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यातील किस्से जाणून घ्यायला बरेच आवडतात.

Tags: actoramitabh bachchanfan momentkon banega carorepati season 15
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar

फुलांची सजावट, जावयाचा मानपान, चांदीची भांडी अन्…; अधिकमासात सासरवाडीत पोहोचले सचिन पिळगावकर, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.