बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक आथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वी आथिया व के.एल. राहुल यांनी सिसहल मीडिया वर पोस्ट करत आई-बाबा होणार असल्याची घोषणा सोशल मीडियामार्फत केली होती. त्यामुळे आता के. एल. राहुल व आथियाच्या बाळाची येण्याची वाट सगळेच जण बघत आहेत. अशातच आता अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील दिसून येत आहे. दोघीना एकत्रित बघून आथिया व अनुष्का बेस्ट फ्रेंड्स झाल्याचे म्हंटले आहे. (athiya shetty baby bump)
आथिया व अनुष्का सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. सध्या दोघीही आपल्या पतीना चीयर करण्यासाठी पोहोचल्या आहेत. अनुष्काने पांढऱ्या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची ट्राऊजर घातली आहे. तसेच तिच्या मागे आथिया असून स्ट्राइप टॉप घातला आहे. दोघीही एका रेस्टॉरंटमध्ये जात आहेत. यावेळी आथियाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत आहे. आथिया व राहुल यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमचा सुंदर आशिर्वाद लकरच येतोय 2025”.तसेच या पोस्टमध्ये बाळाची छोटी पावलंदेखील दिसून येत असून खाली आथिया व राहुल असे लिहिले.
अथिया व के.एल.राहुल हे खूप महीने एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनी कधीही हे माध्यमांसमोर कबूल केले नाही. सुनील यांनी देखील राहुल व अथियाच्या नात्याला परवानगी दिली. दरम्यान आता सुनील शेट्टी खरच आजोबा होणार यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान आथियाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘हीरो’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्याबरोबर सूरज पांचोली दिसून आला होता. त्यानंतर ती ‘मुबारका’ व ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्येही दिसून आली. लग्नानंतर मात्र ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तसेच के. एल. राहुल हा भारतीय क्रिकेटसंघाचा एक उत्तर खेळाडू आहे.