शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्ही मुख्यमंत्री झालात तर…”, अथर्व सुदामेने अमित ठाकरेंना विचारला प्रश्न, दिलं अगदी थेट उत्तर, म्हणाले, “लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 26, 2024 | 1:10 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Amit Thackeray answered what he will do if he become the Chief Minister see the details

"तुम्ही मुख्यमंत्री झालात तर...", अथर्व सुदामेने अमित ठाकरेंना विचारला प्रश्न, दिलं अगदी थेट उत्तर, म्हणाले, "लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य..."

आपल्या रोखठोक भूमिकांनी व दमदार भाषणांनी कायमच चर्चेत राहणारे नेते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे हे सध्याच्या सक्रिय राजकारणात सहभागी नसले तरी त्यांच्या नावाच्या कायमच चर्चा होत असतात. अशातच त्यांचा मुलगा व मनसे विद्यार्थी सेनेचे राज्यप्रमुख अमित राज ठाकरे यांचीदेखील चर्चा होत आहे. अमित ठाकरे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्राच्या राजकारणात सहभाग घेतला असून सध्या ते तरुणाईचं लक्ष वेधून घेत आहेत.

नुकताच ‘झी युवा सन्मान पुरस्कार २०२४’ हा सोहळा पार पडला असून यंदाच्या झी युवा नेतृत्व सन्मान या पुरस्काराने अमित ठाकरे यांना सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे सोशल मीडियासह सर्व माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. येत्या रविवारी ३१ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर ‘झी युवा सन्मान पुरस्कार’ सोहळा प्रसारित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

आणखी वाचा – “अरुंधती चुकली आणि ती…”, ‘आई कुठे…’चा नवा प्रोमो पाहून संजनाची बाजू घेत आहेत प्रेक्षक, नेमकं काय घडलं?, म्हणाले, “अनिरुद्ध व तिच्यामध्ये…”

यावेळी आमित ठाकरेंना भविष्यात ते मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कोणत्या गोष्टी बदलाल? असा प्रश्न विचारण्यात आला. यांचे उत्तर देत अमित ठाकरेंनी असं म्हटलं की, “खरंतर अशा खूप गोष्टी आहेत, ज्या मला बदलायच्या आहेत. लहानपणी आमच्या घरी खूप लोकं यायची. तेव्हा मी त्यांचे निरीक्षण करायचो. आई मला शाळेत घेऊन जायची किंवा मोठा झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये वगैरे जायचो तेव्हा मी निरीक्षण करायचो की, लोकांच्या चेहऱ्यावर या राज्यात, शहरात राहण्याचे एक हसू व एक समाधान असायचे. ते आता दिसत नाही.”

आणखी वाचा – “या भूमिकांसाठी तुम्हीच योग्य”, स्पृहा जोशी व सागर देशमुखच्या ‘सुख कळले’ मालिकेच्या नवीन प्रोमोला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

यापुढे ते असं म्हणाले की, “आज आपण बाहेर जाऊन लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर तुमच्या लक्षात येईल की लोकांच्या चेहऱ्यावरचं ते हसू गायब झाले आहे आणि ते हसू व समाधान मला परत आणायचे आहे. लोकांना या शहरात किंवा या राज्यात राहणे चांगलं वाटलंच पाहिजे आणि त्यांच्या या राज्यात किंवा या शहरात राहण्याबद्दलचे हसू मला पुन्हा आणायचे आहे.”  दरम्यान, अमित यांच्या नावाला ‘ठाकरे’ आडनावाचं एक वलय असलं तरी आपल्या नेतृत्वगुण आणि वक्तृत्वशैलीने अमित ठाकरे यांनी तरुणाईमध्ये त्यांच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. तसेच तरुणाईचाही त्यांना चांगलाच पाठिंबा मिळत आहे.

.

Tags: Amit Thackeraymarathi entertainment newsRaj Thackeray's son
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Advait Kadane appeared in the Navri Mile Hitlarla serial

'आई कुठे…'मधून बाहेर पडल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एन्ट्री, फोटो शेअर करत म्हणाला, "नवी मालिका…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.