ओटीटीवर दर आठवड्याला नवीन काहीतरी प्रदर्शित होतंच असते. ओटीटीवर अॅक्शन, ड्रामा, रोमान्स अशा सगळ्या आशयाचे नवीन चित्रपट किंवा वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. अशातच येत्या वीकेंडला ओटीटी वापरकर्त्यांसाठी चित्रपट व वेबसिरीजची पर्वणी असणार आहे. जाणून घ्या हे नवीन चित्रपट आणि वेबसिरीज कोणत्या आहेत.
अमर सिंह चमकिला : पंजाबी गायकाच्या जीवनावर आधारित इम्तियाज अलीच्या ‘अमर सिंह चमकिला’ चित्रपटात दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. तर परिणीती चोप्राने पत्नी अमरजोत कौरची भूमिका साकारली आहे. १२ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
लाल सलाम : जर तुम्हाला सुपरस्टार रजनीकांतचा ‘लाल सलाम’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता आला नसेल, तर तुम्ही तो आता ओटीटी माध्यमावर घरीच पाहू शकता. ओटीटी प्लॅटफॉर्म सननेक्स्ट (SunNext) वर ‘लाल सलाम’ हा चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल.
आणखी वाचा – “शेवंताबाई शेवंताताई झाली”, अपूर्वा नेमळेकरने घटवलं इतकं वजन, जिममधील फोटो शेअर केल्यानंतर चाहतेही चक्रावले
प्रेमालु : ‘प्रेमालु’ हा मल्याळम रोमँटिक-कॉम चित्रपट आहे, ज्यात नसलेने आणि ममिता बैजू मुख्य भूमिकेत आहेत. हा ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. Disney+Hotstar वर प्रेमालू हा चित्रपट पाहता येऊ शकतो.
हार्टब्रेक हाय सीझन २ : २०२२ मध्ये नेटफ्लिक्सवर ‘हार्टब्रेक हाय’ हिट झाल्यापासून, पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘हार्टब्रेक हाय सीझन २’ हा सीझन १ पेक्षा अधिक रोमांचक आहे. या मालिकेत एकूण ८ भाग आहेत. ही मालिका तुम्ही घरबसल्या नेटफ्लिक्सवर पाहू शकता.