शनिवार, सप्टेंबर 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शेवंताबाई शेवंताताई झाली”, अपूर्वा नेमळेकरने घटवलं इतकं वजन, जिममधील फोटो शेअर केल्यानंतर चाहतेही चक्रावले

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 23, 2024 | 3:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Apurva Namelekar shared some special photos of her in the gym

"शेवंताबाई शेवंताताई झाली", अपूर्वा नेमळेकरने घटवलं इतकं वजन, जिममधील फोटो शेअर केल्यानंतर चाहतेही चक्रावले

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून सावनी या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’सारखी मालिका किंवा ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये खेळलेल्या विविध टास्कद्वारे स्वतःचं वैशिष्ट्य दाखवून दिलं आहे. अपूर्वानं मालिकांमध्ये काम करत तिनं प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Apurva Nemlekar On Instagram)

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील पसंती मिळते. अशातच अभिनेत्रीने केलेल्या काही खास फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अपूर्वाने तिच्या सोशल मीडियावर जिममधले काही खास फोटो शेअर केले आहेत. “मी फिनिक्स पक्षासारखी पुन्हा शून्यातून उठून पुन्हा उभारी घेतली आहे. याला माझा पुढचा भाग म्हणू शकता. कारण आता मी कधीही थांबणार नाही.” असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

आणखी वाचा – Video : “ठाण्याचे असतील तलाव फेमस पण नाशिकची नदी…”, चेतन वडनेरेचा बायकोसाठी खास उखाणा, मंडपातील व्हिडीओ समोर

अपूर्वाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचे वजन कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि यासाठी तिने घेतलेली मेहनत या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. अपूर्वाने याआधी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता ही भूमिका केली होती. यात तिचे वजन अधिक होते. मात्र अपूर्वाने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने आपले वकाजन बऱ्यापैकी कमी केल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा – Video : “भावा जिंकलंस”, विकी कौशलबरोबर संतोष जुवेकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते भारावले, घट्ट मैत्री, धमाल गप्पा अन्…

दरम्यान, अपूर्वाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच तिच्या या खास बदललेल्या लूकचे मेघना एरंडे, तेजस्विनी लोणारी या कलाकारांसह अनेक चाहत्यांनीही कौतुक केले आहे. “शेवंताबाईची शेवंताताई झाली, मस्तच, खूपच छान दिसत आहेस, तू नेहमीसारखीच सुंदर दिसत आहेस, वजन कमी करायचं खूपच मनावर घेतलं आहेस” अशा अनेक कमेंट्स करत तिच्या बदललेल्या लूकचे कौतुक केले आहे.

Tags: Apurva Namelekarmarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Pankaj Tripathi sister accident

Video : पंकज त्रिपाठीच्या मेहुण्याच्या भयावह अपघाताचा व्हिडीओ समोर, कार वेगात होती अन्…; बहिणीची मृत्यूशी झुंज सुरु

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.