मराठीसिने जगतातील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांनी कॉलेजात असताना खूप कमी वयात “लेक चालली सासरला” नावाच्या चित्रपटामध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली. तिने अनेक मराठी चित्रपटात सोज्वळ तसेच सालस अभिनेत्रीची भूमिका साकारल्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात तिच्या विषयी एक वेगळीच जागा निर्माण झाली. अशी सालस सून आपल्याला सुद्धा पाहिजे अशी अशा त्या काळातील प्रत्येक सासूला लागलेली असायची.(alka kubal)
त्यांनी त्यांच्या चित्रपटात साकारलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी तेवढीच मेहनत सुद्धा घेतली आहे. जेव्हा त्या “राजानं वाजवला बाजा” या चित्रपटात काम करत होत्या तेव्हा त्या चित्रपटात विहिरीत उडी मारायचा एक सीन करायचा होता. त्यावेळेस त्यांना या सीनसाठी डमी वापरण्यासाठी सांगितले होते. परंतु त्यांनी त्या वेळेस डमी वापरण्यास मनाई केली होती. परंतु त्यांनी या निर्णयासाठी जेष्ठ अभिनेत्री रंजना यांचा ओरडा खाल्ला होता.

या सिनसाठी दिग्दर्शकाला रिव्हर्स शॉर्ट घ्यायचा असल्याने या सीन मध्ये चीटिंग केल्यासारखे वाटले असते, म्हणून अलका यांनी या सीनसाठी डमी न वापरण्याचा निर्णय घेतला होता. जेवढ्या वेगाने त्या पाण्यात उडी मारतील तेवढ्याच वेगाने त्या पाण्यातून वर येतील असे हा सीन करताना आलकांना वाटले होते. पण विहिरीत पाणी कमी असल्यामुळे वरून उडी मारण्याचा धोका मात्र त्यांना होता परंतु ऐनवेळेस डमी कुठून आणायची असा विचार त्यांच्या मनात आल्यावर त्यांनी हा सीन धोका पत्करून स्वतःच केला होता. वरवर प्रेक्षकांना हा सीन बघायला खूप सोप्पा ही वाटला असेल पण जीवावर धोका पत्करून अलकाने हा सीन केल्यामुळे जेष्ठ अभिनेत्री रंजना या अलका यांना खूप ओरडल्या होत्या.(alka kubal)
कधी कधी कलाकार हा त्याच्या पडद्यावरच्या अभियनायासोबतच अभिनया सोबतच त्या मागे त्याच्या मेहनतीमुळे सुद्दा प्रसिद्ध होतो. कधी कधी अतिउत्साहात केलेलं धाडस महागात हि पडू शकत. या काळजीने रंजना आणि अलका यांना सुनावलं असावं. अलका कुबल ह्या आजही त्यांच्या एका विशेष कलाकृतीसाठी आज ओळ्खल्याजातात ते म्हणजे ‘ माहेरच्या साडी ‘ या चित्रपटासाठी.
=====
हे देखील वाचा- “पुन्हा असली कामं करू नकोस रे बाबा!” जेव्हा काम बघून आई नानांना म्हणाल्या…
=====
