कोरोना हा काळ आपल्या सर्वांसाठीच त्रासदायक होता. अनेक जवळच्या व्यक्तींना गममाव लागलं होतं. अनेक कलाकार मंडळींनीही कोरोना काळात आजारपणाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण काही कायमच्या आठवणी या कलाकारांनी प्रेक्षकांना दिल्या. अशीच एक आठवण कायमची देऊन गेल्या त्या म्हणजे अभिनेत्री आशालता वागबावकर. घरच्या माणसांनी कोणीही अंत्यसंस्कार न करता मनोरंजनविश्वातील एका मैत्रिणीनेच आशालता यांचे अंत्यसंस्कार केले होते.(Alka Kubal Ashalata Wagbaonkar)
अभिनेत्री अलका कुबल यांनी कोरोना काळात अभिनेत्री आशालता वागबावकर यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. कोरोना काळात जेष्ठ कलाकारांना सेटवर जाण्यास मनाई होती पण थांबेल तो कलाकार कसला. आशालता त्यावेळी साताऱ्यामध्ये आई माझी काळूबाई मालिकेच्या शूटिंग मध्ये अलका कुबल यांच्या सोबत होत्या. शूटिंग मध्ये असतानाच त्यांची प्रकृती बिघडली आणि वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

आशालता या त्यांच्या घरातल्यांवर नाराज होत्या त्यामुळे त्यांनी अलका कुबल आणि समीर यांना मी गेल्यानंतर माझे सगळे विधी तुम्हीच करा असं सांगितलं होतं. अलका कुबल यांनी सुद्धा मैत्रिणीची इच्छा पूर्ण केली आणि साताऱ्यातच आशालता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अलका कुबल आणि आशालता वागबावकर यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये केतर काम केले. अलका कुबल यांच्या प्रसिद्ध माहेरच्या साडी या चित्रपटात देखील या दोघी एकत्र झळकल्या होत्या.