रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. २६ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या पहिल्या क्रमांकावर टेंडींगवर आहे. हा चित्रपट हिंदीसह दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर ‘सॅम बहादूर’ हा चित्रपटही प्रजासत्ताक दिनानिमित्त झी-५वर प्रदर्शित झाला आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिझ्नी प्लस हॉटस्टार, जिओ सिनेमा आणि लायन्सगेट प्लेवरदेखील मनोरंजक चित्रपट व वेबसिरीज येत आहे. यामध्ये ऐतिहासिक, ॲक्शन व डॉक्युड्रामा यांचा समावेश आहे.
(१) ‘अलेक्झांडर – द मेकिंग ऑफ अ गॉड’ (Alaxander- The Making Of A God) : ही सिरीज येत्या ३१ जानेवारीला नेटफ्लिक्सवर येत आहे. जर तुम्हाला इतिहासाशी संबंधित विषयांमध्ये रस असेल तर ही सिरीज फक्त तुमच्यासाठी आहे. या सीरिजमध्ये अलेक्झांडरची जगज्जेता बनण्याची आकांक्षा दाखवण्यात आली आहे. तज्ज्ञांशी संभाषणांसह अनेक मोहक दृश्यांचे नाट्यमयरित्या चित्रपट य सीरिजमध्ये करण्यात आले आहेत.
(२) ‘नेवर बॅक डाउन २’ (Never Back Down 2) : नेटफ्लिक्सची ही ॲक्शन फिल्म ‘नेव्हर बॅक डाउन’ येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे, याचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध ॲक्शन अभिनेता मायकेल जे व्हाईट यांनी केले आहे. या चित्रपटात मायकेलने मुख्य भूमिकाही साकारली आहे.
(३) मिस परफेक्ट (Miss Perfect) : मिस परफेक्ट ही एक तेलुगु कॉमेडी कौटुंबिक सीरिज आहे. ज्यात लावण्य त्रिपाठी व अभिजीत दुद्दला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. येत्या २ फेब्रुवारी रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही मालिका तेलुगूसह हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषांमध्ये प्रसारित केली जाणार आहे.
(४) मिस्टर एंड मिसेज स्मिथ (Mr. And Mrs. Smith) : येत्या २ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडीओवर ही सीरिज येत आहे. ‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’ ही डोनाल्ड ग्लोव्हर व माया अर्स्कीन अभिनीत स्पाय कॉमेडी सीरिज आहे. ही इंग्रजी भाषेत ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
(५) सैंधव (Saindhav) : वेंकटेश यांची मुख्य भूमिका असलेला ‘सैंधव २’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहानंतर प्राइम व्हिडिओ या ओटीटीवर येणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपट तामिळ, मल्याळम व कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार. मात्र अद्याप ओटीटी प्लॅटफॉर्मने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही.
(६) वन रेंजर (One Ranger) : येत्या २ फेब्रुवारी रोजी लायन्सगेट प्ले या ओटीटी माध्यमावर वन रेंजर प्रदर्शित होणार आहे. जोश हॉलॉवे टेक्सस रेंजरच्या भूमिकेत आहे. तर जेम्मा आर्टरटन या एजंटची भूमिका करत आहे. जो ब्रिटीश इंटेलिजन्सद्वारे भरती होतो. असे यात दाखवण्यात आले आहे.